नवीन लेखन...

सिस्मोग्राफ (भूकंपमापक)

भूकंप होत असताना ज्या लहरी जमिनीखाली निर्माण होतात त्या पसरत जातात तेव्हा त्यांची नोंद आरेखन किंवा आलेखाच्या माध्यमातून घेतली जाते. हे काम ज्या यंत्राच्या मदतीने केले जाते त्याला सिस्मोग्राफ असे म्हणतात. आपण एक पेन उभ्या अ अवस्थेत स्थिर धरला, त्याखाली कागद ठेवला व तो जरा थरथरत्या हाताने ओढला तर त्या कागदावर खालीवर झालेल्या रेषांचे चित्र उमटेल काहीसे तसेच भूकंपमापन यंत्रात घडते.

यात ज्या रेषा दिसतात त्या जमिनीचे दोलन वेगवेगळ्या अॅम्प्लीट्यूडमध्ये दाखवतात. अतिशय संवेदनशील अशा सिस्मोग्राफमध्ये जमिनीच्या हालचाली जगात कुठल्याही भागात होत असतील तरी नोंदवल्या जातात. अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हे या संस्थेतील सिस्मोग्राफमध्ये तशी सोय आहे. सिस्मोग्राफ स्टेशनवर घेतल्या गेलेल्या नोंदींच्या आधारे आपल्याला भूकंपाची वेळ, स्थान व तीव्रता समजते. चिनी वैज्ञानिक चँग हेंग याने पहिल्यांदा सिस्मोस्कोप बनवला होता, त्याला त्यावेळी ड्रॅगन जार असे नाव देण्यात आले होते. त्याच्या या बरणीत वरच्या भागात ड्रॅगनची आठ तोंडे होती तर खालच्या भागात बेडकाची आठ तोंडे होती.

भूकंप झाल्यानंतर ड्रॅगनच्या तोंडातील चेंडू बेडकाच्या तोंडात पडत असे. पहिला आधुनिक सिस्मोग्राफ हा इंग्लंडचे वैज्ञानिक जॉन मिलने यांनी शोधून काढला. त्यानंतर सर जेम्स आल्फ्रेड एविंग्ज, थॉमस ग्रे व जॉन मिलने या तिघांनी जपानमध्ये सिस्मॉलॉजिकल सोसायटी ऑफ जपान या संस्थेची स्थापना केली. दीर्घकालीन भूकंपलहरींसाठी प्रेस-एविंग सिस्मोग्राफ वापरला जातो. त्यातही मिलने यांनी तयार केलेल्या दोलकाचा (पेन्ड्यूलम) वापर केला जातो.

सिस्मोग्राफमध्ये भूकंपाची तीव्रता ही मुख्यत्वेकरून ज्या रिश्टर मापनात मोजली जाते त्याचा शोध अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूटचे चार्लस एफ रिश्टर यांनी १९३५ मध्ये लावला. रिश्टर हे लॉगरिथमिक मापन आहे त्यामुळे प्रत्यक्ष जो पूर्णांकातील आकडा दिसतो त्याच्या तो दहापट अधिक असतो. साधारण सहा रिश्टरच्या पुढचा भूकंप हा मोठा मानला जातो. संदर्भ विस्थापन हा मूलभूत प्रकार सिस्मोग्राफमध्ये असतो यात जडत्व असलेला मोठा दोलक असतो व त्याच्या खाली एक चौकट असते.

भूकंपलहरींमुळे ती हलू लागते पण दोलक त्याच्या जागेवरच राहण्याचा प्रयत्न करतो. यात दोलक हा संदर्भ बिंदू म्हणून काम करीत असतो. इलेक्ट्रोमॅग्रेटिक सेन्सरवर आधारित सिस्मोग्राफमध्ये जिओफोनचा समावेश होतो. त्वरणाच्या आधारे म्हणजे अॅक्सिलरोमीटरच्या मदतीनेही मापन करता येते पण ते भूकंपाच्या केंद्राच्या जवळपास करावे लागते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..