जन्म: १९ मे १९१३
मृत्यू: १ जून १९९६
नीलम संजीव रेड्डी आणीबाणीत पुन्हा सक्रिय राजकारणाकडे आकृष्ट झाले. जनता पक्षातर्फे ते निवडून आले. राष्ट्रपतिपदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली. राष्ट्रपतिपदाची शान त्यांनी पक्षांतर्गत विरोध सहन करून सांभाळली.
कार्यकाळ: २५ जुलै १९७७ ते २५ जुलै १९८२
भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे व स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील इल्लूर (अनंतपूर जिल्हा) या गावी सधन शेतकरी कुटुंबात झाला. संजीव रेड्डी सुरुवातीचे शिक्षण अड़यारला (मद्रास) थिऑसॉफिकल विद्यालयात झाले. नंतर त्यांनी अनंतपूरच्या कला महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. विद्यार्थिदशेतच ते युवक़ काँग्रेसकडे आकृष्ट झाले. १९३१ मध्ये त्यांनी शिक्षण अर्धवट सोडून महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत भाग घेतला. त्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला. फावल्या वेळेत त्यांनी मिळेल ती नोकरी केली, पण कुठेच ते स्थायी सेवेत रुजू झाले नाहीत. पुढे ते आंध्र प्रांतिक काँग्रेसचे सचिव झाले. म. गांधीजींनी सुरू केलेल्या बहुविध आंदोलनात त्यांनी भाग घेतला. सविनय कायदेभंगाची चळवळ आणि भारत छोडो आंदोलनात त्यांना प्रदीर्घ कारावासाच्या शिक्षा झाल्या. १९४६ मध्ये त्यांची मद्रास प्रांताच्या विधानसभेवर निवड झाली. भारतीय संविधान समितीचेही ते सदस्य होते. स्वातंत्र्योत्तर काळात मद्रासच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषिवले. त्यानंतर ते आंध्र प्रांतिक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. राज्य पुनर्रचनेनंतर नव्याने निर्माण झालेल्या आंध्र प्रदेश राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री बनले. ९ जून १९६४ रोजी त्यांना पोलाद व खाणकाम खात्याचे मंत्री म्हणून लालबहादूर शास्त्रींनी केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले. १९६७ साली त्यांची लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली. राष्ट्रपति पदासाठी त्यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला.
Leave a Reply