या देवी सर्व भुतेषु माँ स्कंदमाता रुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
देव आणि असूर यांच्या युध्दात देवांचा सेनापती म्हणून भगवान कार्तिकेय हे प्रमुख स्थानी होते. दुर्गामाता ही देखिल युध्दात होती.म्हणून तिला स्कंदमाता असे नामाभिदान आहे. चतुर्भूज असलेल्या स्कंदमातेने डाव्या हातात कमलपुष्प घेतलेले आहे तर ऊजव्या हाताने आशिर्वाद देत आहे. ती कमलासनावर बसलेली आहे.म्हणून तिला पद्मासनादेवी असंही म्हणतात.
स्कंदमातेने तिच्या भक्तांना विद्या प्राप्तीचं वरदान दिलेलं आहे. सहा वर्गांच्या कन्येचं स्वरुप मानून अशा कन्येला पूजा करवून गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखविला जातो. स्कंदमातेने ती शिवस्वरुप असलेने या दिवशी तिला बेलपत्रांची माळ अर्पण केल्यास ती प्रसन्न राहते. तिला कालीमाता म्हणूनही ओळखतात.
शिवस्वरुपा असलेनेआणि पांचवी माळ असल्यामुळे या दिवशी भगवा म्हणजे नारिंगी वा केसरी रंग महत्वाचा मानला जातो. हा रंग जो रविवारी धारण करतो म्हणजे या रंगाचे कपडे परिधान करणाऱ्या व्यक्तिच्या वडीलांचे संरक्षण होते. हा रंग ऊगवत्या सूर्याचा असल्यामुळे या रंगावर सूर्याचा अधिकार आहे. सूर्य आपल्या ह्रदयस्थ असल्यामुळे आपल्या ह्रदयावर त्याचा अधिकार आहे. या रंगामुळे सूर्याची ऊर्जा,धारणकर्त्यास सामर्थ्यवान तर बनवतेच आणखी ह्रदय् पिडेचा धोकाही कमी होतो.
शुभं भवतु
— प्रा. गजानन शेपाळ
Leave a Reply