सिंहासन नित्यं पद्माश्रितकरद्वया । शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी ॥
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासुन सुरु होणाऱ्या नवरात्रात नवशक्तींची आराधना केली जाते, त्यातील मातेचे पाचवे रुप म्हणजे स्कंदमाता होय.
देवासुर संग्रामातील देवांचा सेनापती कार्तिकेयाचे नाव स्कंद, स्कंदाची माता म्हणुन स्कंदमाता हे नाव रुढ झाले. या दिवशी साधकांचे मन विशुद्धीचक्रात असने आवश्यक आहे. ही देवी चर्तुभुज असुन, तिच्या दोन्ही हातात कमलपुष्प आहे. एक हात वर मुद्रेत आहे, तसेच एका हाताने मांडीवर बसलेल्या भगवान स्कंदाला धरुन ठेवले आहे. वर्ण शुभ्र असुन, देवीचे वाहन सिंह आहे. शुंभ-निशुंभ या बलशाली दैत्यांचा सेनापती धुम्रलोचनाला एका हुंकारात भस्म करणारी देवी महापराक्रमी आहे. देवीच्या उपासनेने बाह्यक्रीया व चित्तवृत्ती नाहीशी होते, मानव सर्व सांसारिक, लौकिक,मायिक बंधनातुन मुक्त होतो व उपासकाला अलीकिक तेज प्राप्त होते. स्कंदमातेची उपासना केल्याने आपोआपच स्कंदाची उपासना होते. देवीला कुमार आणी शक्तीधर नावानेही ओळखले जाते.
स्कन्दमाता स्तोत्रपाठ नमामि स्कन्दमाता स्कन्दधारिणीम्। समग्रतत्वसागररमपारपार गहराम्॥
शिवाप्रभा समुज्वलां स्फुच्छशागशेखराम्। ललाटरत्नभास्करां जगत्प्रीन्तिभास्कराम्॥
महेन्द्रकश्यपार्चिता सनंतकुमाररसस्तुताम्। सुरासुरेन्द्रवन्दिता यथार्थनिर्मलादभुताम्॥
अतर्क्यरोचिरूविजां विकार दोषवर्जिताम्। मुमुक्षुभिर्विचिन्तता विशेषतत्वमुचिताम्॥
नानालंकार भूषितां मृगेन्द्रवाहनाग्रजाम्। सुशुध्दतत्वतोषणां त्रिवेन्दमारभुषताम्॥
सुधार्मिकौपकारिणी सुरेन्द्रकौरिघातिनीम। शुभां पुष्पमालिनी सुकर्णकल्पशाखिनीम्॥
तमोन्धकारयामिनी शिवस्वभाव कामिनीम्। सहस्त्र्सूर्यराजिका धनज्ज्योगकारिकाम्॥
सुशुध्द काल कन्दला सुभडवृन्दमजुल्लाम्। प्रजायिनी प्रजावति नमामि मातरं सतीम्॥
स्वकर्मकारिणी गति हरिप्रयाच पार्वतीम्। अनन्तशक्ति कान्तिदां यशोअर्थभुक्तिमुक्तिदाम्॥
पुनःपुनर्जगद्वितां नमाम्यहं सुरार्चिताम्। जयेश्वरि त्रिलोचने प्रसीद देवीपाहिमाम् ॥
Leave a Reply