हे जगदंबे ! सदैव होते नाम मुखी गे
लोप पावले आज कसे ते तू मज सांगे…..१
लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी
धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी….२
काही हवेसे वाटू लागले एके दिवशी
विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी….३
आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती
गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती….४
तगमग करूनी तेच मिळविता आज
कल्पना विलास होता तो झाली ही समज….५
खिळवू नकोस मनास गे बाह्य जगाभोवती
स्मरण असू दे तव नामाचे ओठावरती….६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply