तव बकुळफुलांच्या सुगंधात
अजुनही मी विरघळतो आहे..
कां? या प्रश्नाला उत्तर नाही
भाग्यच भाळीचे भोगतो आहे..
तव लडिवाळ स्मरण गंधाळ
चराचरातुनी दरवळतो आहे..
काय, काय, कसे विसरावे
याच संभ्रमी मी जगतो आहे..
घुसमट विरही असह्य जीवा
मनआभाळही गहिवरले आहे..
तव बकुळफुलांच्या सुगंधात
अजुनही मी विरघळतो आहे..
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २८१
२/११/२०२२
Leave a Reply