नवीन लेखन...

स्मार्ट सिटी नागपूर

काल प्रख्यात टीव्ही चॅनलचे आमंत्रण आले म्हणून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सभागृहात गेलो. विषय नागपूरमध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुका होता. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वतंत्र विदर्भ, व बसपा यांचे मातब्बर नेते आपली बाजू मांडत होते, तसेच दुसऱ्या पक्षाने या शहराची कशी वाट लावली, हे सांगण्याचा त्यांचा प्रत्येक वाक्यात भर होता.

भाजप आम्ही मेट्रो या शहरात आणली, तसेच आता इथेनॉल वर चालणाऱ्या 50 बसेस आणणार आहोत, असे सांगत होते. त्याला उत्तर देताना काँग्रेस नेते म्हणाले आम्ही आमच्या सत्तेच्या काळात 300 बसेस या शहराला दिल्या, सरासरी या बसेसचे आयुष्य 15 वर्षे असायला पाहिजे, परंतु 8-9 वर्षांतच त्यातील जवळपास 200 बसेस मोडकळीस आल्या, आणि फक्त 95-100 चालू स्थितीत आहेत, याला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे.

गोष्ट अगदी बरोबर आहे, जवळपास 200 बसेस मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत हे मान्य करावेच लागेल. त्या का नादुरुस्त अवस्थेत आहेत याची करणे दिल्यास, हे सर्वाना लक्षात येईल कि, सामान्य जनता या सुविधा देण्याच्या लायकीचीच नाही, हे शब्द जरी कठोर असतील, पण हे सत्य आहे, कि या लोकांना कोणतीही चांगली वस्तू द्या त्याची वाट लावण्यातच या लोकांना आनंद मिळतो.

नागपूरमध्ये सिटीबस ला स्टारबस या नावाने ओळखले जाते, यातील ज्या गाड्या नादुरुस्त आहेत त्याच्यावर नजर फिरवलीतर लक्षात येईल, कि बहुतेक गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, हे कृत्य नतद्रष्ट लोकांनी दगडफेकीत केलेले आहे, तसेच सर्व गाड्यांच्या सीट्सचे फोम फाडून त्यातील स्पंज प्रवासी लोकांनी गायब केलेला आहे, तसेच सीट च्या फ्रेम वाकवलेल्या आहेत. काही बसेस जळलेल्या आहेत, ह्या कुणी जाळल्या, हे पहिले तर लक्ष्यात येईल, कि झोपडपट्टीतील, किव्वा शहरातील काही भाग जिथे असामाजिक माणसे जगतात, त्या भागात दंगल अथवा खून झाला कि, त्याचा राग सरकारी वहानांच्यावर निघतो, आणि ती जाळण्यात येतात. आजपर्यंत ज्या लोकांनी हि कृत्ये केली त्यातील एकही तुरुंगात खडी फोडण्यास गेला नाही, कारण यांना वरील उपस्थित कोणत्या ना कोणत्या पक्षाचे पाठबळ मिळालेले असते, आणि म्हणूनच हे मग्रूर लोक असे कृत्य करून ताठ मानेने समाजात फिरत आहेत. काही वर्षातच सुरु होणाऱ्या मेट्रोच्या डब्यात लोक खर्रा खाऊन, थुंकून कोपरे लाल करतील, सीट फाडतील, तसेच काचा फोडतील असे झाल्यास नवल वाटायला नको.

स्वच्छ नागपूर या विषयावर चर्चा करताना पक्ष कार्यकर्त्यांनी सभागृहाचे भान न ठेवता बाचाबाची, सुरु केली, आणि कार्यक्रम जवळजवळ बंदच करण्याची वेळ आली. स्वच्छ भारत अंतर्गत पंतप्रधानांनी मागेल त्याला संडास देण्याचे कबूल केले, आणि तसे देण्यास सुरवातही केली, यासाठी मी कार्यक्रमात शासनाला मदत करण्याचा प्रयत्न केला, यात जी वस्तुस्थिती माझ्या समोर आली, त्याची कथा वाचल्यास सुजाण नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.

जनधन योजनेअंतर्गत प्रत्येक दारिद्र्य रेषेखालील लोकांचे शून्य पैसे भरून खाते उघडण्यात आले, या खात्यात, ज्यांना संडास हवे असतील त्यांच्याकडून आधार कार्ड, पासबुक यांची प्रत मागवून त्यात सरकारने रु 8000, पहिला हप्ता म्हणून भरले, अट हि कि, त्यांनी संडास बांधावेत, व संडास पूर्ण बांधून झाल्यावर उरलेले 8000 दुसऱ्या हप्त्यात जमा होणार. 85 टक्के लोकांनी हलकट वृत्ती दाखवत, पहिल्या हप्त्याचे जनधन खात्यात भरलेले रु 8000 खाऊन टाकले, वरती सरकारी अधिकाऱ्यांना तोंड वर करून सांगत होते कि, आम्हाला माहीतच न्हवते संडास बांधण्यासाठीचे हे पैसे आहेत. याना हे सर्व शिकवणारे अर्थात बोलावते धनी वेगळेच होते हे सांगायची गरज नाहीच.

नागपूर महानगरपालिकेने मग निर्णय बदलून, स्वतःच संडास बांधून देण्याचे ठरवले, त्या प्रमाणे फायबर (FRP) चे बनवलेले संडास लाऊन देण्याचे ठरले, व टेंडर पद्धतीने असे संडास लावण्याच्या निविदा काढल्या. हे संडास लागले, परंतु पुढच्या दोन दिवसात सर्व शौचगृहांचे दरवाजे रात्रीत तोडून गायब करण्यात आले, संडासच्या छिद्रात दगडे, विटा टाकण्यात आल्या. किती नतद्रष्टेपणा या लोकांच्यात ठासून भरलेला आहे याची हि उदाहरणे आहेत, आज परत ही सर्व मंडळी लोटा घेऊन रस्त्याकडेला, किव्वा रानात जातात. सर्वात प्रथम हंटरने याना फोडून काढले पाहिजे, हेच लोक समाजातील मुख्यप्रवाहात सामील होण्यास तयार नाहीत, असे लोक आर्थिक मागासलेले नाहीत, कारण बहुतेकांच्या घरात टीव्ही आहे, डिश अँटेना अनेक घराच्या छतावर दिसतात, मोटरसायकल आहे, तर मानसिक दिवाळखोरीत जगत आहेत, त्यांना तसेच राहण्यातच समाधान आहे. नागपूर हे एक उदाहरण आहे, अश्या घाणेरड्या वृत्तीची लोक भारताच्या प्रत्येक शहरात ठासून भरलेले आहेत, त्यामुळे सगळीकडची परिस्थिती कमीअधिक प्रमाणात सारखीच असणार आहे.

मुळात आपल्या देशात सुजाण, सुसंकृत, पिढी तयार करण्यासाठी प्रयत्नच होत नाहीत, हेच खरे दुर्दैव आहे. या देशात जवळ जवळ सर्व जातीचे लोक, आम्ही कसे मागास, उपेक्षित, गरीब, दुबळे आहोत, हे सांगण्यात एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात, असा देश प्रगत होण्याची चिन्हे येणाऱ्या पन्नास वर्षातही दिसणार नाहित.

सकाळी लोट्या सोबत स्मार्ट फोन घेऊन लोक वावरात जातील, यालाच स्मार्ट सिटी/शहर, म्हणायचे का?

— विजय लिमये

Avatar
About विजय लिमये 49 Articles
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..