सेलफोन हा केवळ बोलण्यासाठी कामाचा होता, त्यामुळे त्याच्या उपयुक्ततेला मर्यादा होत्या. त्यातूनच हातात मोबाईलसारखेच यंत्र असेल पण त्यावर ईमेल, फोन कॉल्स, घड्याळ, नोट पॅड अशा अनेक सुविधा देता आल्या तर बरे होईल, या विचारातून स्मार्टफोन ही संकल्पना पुढे आली.
स्मार्टफोन याचा अर्थ अनेक उपयोग असलेला सुधारित सेलफोनच होय. फक्त तो तांत्रिकदृष्ट्या खूपच प्रगत असतो. आयबीएम कंपनीने सिमॉन हा पहिला स्मार्टफोन १९९२ मध्ये तयार केला, त्यानंतर नोकिया ९००० हा स्मार्टफोन बाजारात आला. त्यात ईमेल, अॅड्रेस बुक, घड्याळ, दिनदर्शिका, नोटपॅड, फॅक्स स्वीकारणे अशा काही सुविधा होत्या.
त्यानंतर जे स्मार्ट फोन आले त्यात संगीत ऐकणे, छायाचित्रे घेणे असे अनेक उपयोग होते. हातात एकच साधन, पण त्याचे उपयोग मात्र अनेक हे स्मार्टफोनचे वैशिष्ट्य असते. कॉल घेणे व कॉल करणे, व्यक्तिगत माहितीचे व्यवस्थापन, ईमेल संदेश पाठवणे, ऑडिओ, व्हिडिओ फाईल्स पाठवणे व बघणे अशा संख्य सुविधा अआता यात आहेत.
वायरलेस क्रेडिट कार्डसारखाही त्याचा उपयोग होऊ शकतो, स्मार्टफोन हा तुमच्या हातातला संगणक असतो असे म्हणायला हरकत नाही. तो प्रोसेसर म्हणजे संस्कारकाच्या मदतीने चालतो, त्याचा वेग १००-६२४ मेगाहर्ट्स किंवा आता १ गिगहझ इतका असतो, पण इतका वेगही त्यावर डेस्कटॉप संगणक असंख्य सुविधा आता यात आहेत.
वायरलेस क्रेडिट चालवण्यास कमी पडतो, त्यामुळे एआरएम प्रोसेसर वापरले जातात, स्मार्टफोनमध्ये संगणकाची चिपही असते. कमेऱ्याची सोय असते. काही वेळा यात प्रत्येक उपयोगासाठी वेगळी चिप असायची, पण आता सर्व उपयोगांचा समुच्चय असलेली एकच चिपही असते. त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये केरनेल, मिडलवेअर, अॅप्लिकेशन, एक्झिक्युशन इनव्हिरॉनमेंट, युजर इंटरफेस फ्रेमवर्क असे भाग असतात, त्यांच्या मदतीने सर्व कार्ये नियंत्रित केली. जातात. प्रत्येत स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी असते. पण तो सेलफोनप्रमाणेच डिजिटल रेडिओ तंत्रज्ञानावरच आधारित असतो.
हार्ड ड्राईव्हप्रमाणे त्याला फ्लॅश मेमरी असते. आताचे स्मार्टफोन हे बहुतांश टचस्क्रीन स्वरूपातील आहेत. लासवेगास येथे अलीकडेच मोटोरोलाच्या अँट्रिक्स या फोर जी स्मार्टफोनने पुरस्कार पटकावला आहे. त्याची ड्युअल कोअर प्रोसेसर क्षमता १ गिगॅहर्ट्स असून त्याला ५ मेगापिक्सेलचा कॅमेराही आहे. सुरुवातीला तो अमेरिकेत उपलब्ध करून दिला जाणार आहे.
Leave a Reply