सांग असे कसे विसरू मी तुला
तुजविण , जगणेच मला रुचेना
रोजरोज सरतो दिवस एकएक
कसे समजवावू मनाला कळेना
चालताना पावलोपावली भेटती
सर्वत्र तुझ्या खुणा कां ? सांगना
क्षण ते सारेच सारे प्रीतभारलेले
कां ? तूं कधी विसरलीस सांगना
तो मोगरा लाजाळू उभा प्रांगणी
गंध त्याचा तुजविण दरवळवेना
सारे जसे होते तसेच आज आहे
फक्त तूच दूर , हीच व्यथा सरेना
स्मरती ! आपल्याच गे भेटीगाठी
पण शापीत दुरावा कां ? कळेना
साक्षी अजूनही राऊळीची गोपुरे
सांजवेळीची ही प्रतीक्षा साहवेना
अगम्य सारा सारीपाट जीवनाचा
काहीही केल्या , स्मृतिगंध सरेना
मौनात , उलघाल प्रीतभावनांची
सत्य ! शब्दात कसे गुंफू सांगना
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १२४
२३ – ९ – २०२१.
Leave a Reply