स्मृतींलहरींच्या हिंदोळ्यावर
मन धावते, हरीच्या गोकुळी।।धृ।।
रवीरथी नारायण हरिमुरारी
घुमवी मंजुळ मधुरम पावरी
जागते गोकुळी राधा बावरी
छुमछुम छंदी, नाद गोकुळी।।१।।
चराचरातुनी सुरेल नादब्रह्म
हरेरामकृष्ण, गोविंद गोविंद
जीवा तोषवीतो हरि कृपाळु
देवकीनंदन, ब्रह्म ते गोकुळी।।२।।
प्राजक्त,उभा रुक्मिणी द्वारी
सडा फुलांचा सत्यभामे द्वारी
निर्मळी प्रीती, निर्मळी भक्ती
हरिहराचा भुलभुलैया गोकुळी।।३।।
— वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १३७.
२० – ५ – २०२२.
Leave a Reply