नकोस बोलू, मीही सारे जाणतो
न उरले, काहीच बोलण्यासारखे
जाणतो मी, तुझ्या मौनी वेदनांना
आज नां काहीच विसरण्यासारखे
जे जे अव्यक्त! कसे व्यक्त करावे
सांगनां! तूं काय सावरण्यासारखे
जे, जे घडले, ते, ते हृदयस्थ सारे
सत्य! कोणते व्यक्त करण्यासारखे
तूच सांगनां, काय कसे घडले होते
जगी जगलो साऱ्यांच्या मनासारखे
आज हा असा विरही दुरावा भाळी
यावीण कोणते दुःख भोगण्यासारखे
व्याकुळ अतरंगी, अस्वस्थ दग्धता
तरी सारेच तुझ्याशी बोलण्यासारखे
आता तरी, तूं सोड हा वेडा अबोला
होवू दे, आता तरी थोडे मनासारखे
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र ६०
२७ – २ – २०२२.
Leave a Reply