“सोड मानवा , सोड रे ! हे वागणे आहे लज्जास्पद ,
तुला पाहूनी असे, लाजेल एखादे श्वापद…!
भल्या मोठ्या अपेक्षांची भली मोठी रास रचतोस,
गैरसमजुतीची ठिणगी पडताच, प्रेम वृत्ती मागे सरतोस…!
सन्मान, सचोटी,आदराचा खोटा सोहळा थाटतोस,
तुझा हट्ट हेका मात्र शिरतुरा खोचून सांगतोस…!
नतद्रष्ठ बुध्दी तुझी रे, अजाणते समज बाळगतोस,
सारासार विचार न करता, बंध नात्यांचे चिरडतोस…!
स्वार्थी मन, वासना तुझी रे, दानवासम वागतोस,
म्हणवूनी सत्पुरुष स्वतःस , अहंकाराचा मुकुट घालतोस…!
कुत्सित भावना, कुंठित विचारांची बाजारपेठ मांडतोस,
निर्लज्जपणे तूच तुझी माणुसकी खुलेआम विकतोस…?
सोड मानवा, सोड रे! हे वागणे आहे लज्जास्पद…..!”