सोहराब मोदी यांनी चित्रपटांतही अभिनय केला आहे. दिग्दर्शन आणि निर्मितीमध्येही त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १८९७ रोजी झाला. आपल्या ’मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले. १९३५ मध्ये आलेला त्यांचा खून का खून हा चित्रपट शेक्सुपिअरच्या हॅमलेटवर आधारित होता. सोहराब मोदी यांनी १९५६ मध्ये ‘झाँसी की रानी’ नावाचा भव्य हिंदी चित्रपट काढला होता. त्यात झाशीच्या राणीचे काम मोदी यांची पत्नी मेहताब हिने केले होते. हा भारतात बनलेला पहिला रंगीत चित्रपट होता.त्याचबरोबर पृथ्वीे वल्लेभ, , मिर्झा गालिब, जेलर या चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच सामाजिक आणि राष्ट्रीय विषयाचा समावेश असायचा. भारत सरकारतर्फे १९७९ साली मा.सोहराब मोदी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. सोहराब मोदी यांचे निधन २८ जानेवारी १९८४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply