नवीन लेखन...

सोलर कुकर

अन्न शिजवण्यासाठी आपण अजूनही गॅस किंवा रॉकेल अशा इंधनांचा वापर करतो. गरीब लोक तर अजूनही सरपण गोळा करून त्यावर स्वयंपाक करतात. जीवाश्म इंधने महाग असतात तसेच यातील काही इंधनांमुळे प्रदूषण होते. त्यावर उपाय म्हणून सोलर कुकर हा पर्याय पुढे आला आहे.

सोलर कुकरचा इतिहास हा तसा जुना म्हणजे इ.स. १७०० मधला आहे. त्यावेळी युरोपातील एक निसर्गवादी होरेस द सॉस्युअर यांनी सूर्यापासून ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न केला व त्यातून त्यांनी पेटीसारखा कुकर तयार केला. आजच्या बॉक्स कुकरसारखे त्याचे स्वरूप होते. त्यावेळी त्यांनी या कुकरमध्ये १९० अंश फॅरनहीट इतके तापमान निर्माण करून फळे शिजवली होती.

सोलर कुकिंगच्या तंत्रात नंतर १९५० च्या सुमारास बरेच बदल झाले पण सोलर कुकरला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही.

आपण सूर्यप्रकाशात कागद धरला तर तो जळत नाही पण भिंग घेऊन त्यावर धरले तर सूर्यकिरणांचे संहतीकरण होऊन कागद जळू लागतो. सूर्यापासून आपल्याला विद्युतचुंबकीय प्रारणे मिळत असतात, त्यात उष्णता व प्रकाश दोन्ही असतात.

सोलर कुकर हा भिंगाच्या तत्त्वावर काम करतो फक्त यात भिंगाऐवजी आरसे वापरले जातात, ते काळ्या रंगाच्या भांड्यात बसवलेले असतात. आरशांनी गोळा केलेली उष्णता टिकून राहावी यासाठी प्लास्टिक व काच यांचाही वापर करता येतो.

साधा सोलर कुकर तर घरीही तयार करता येतो. यातील बॉक्स कुकरमध्ये एका लाकडी पेटीत रिफ्लेक्टर, काळ्या रंगाची भांडी, काचेचे झाकण अशी व्यवस्था केली जाते. यात सूर्यकिरण आत जाऊ शकतात, त्यांची ऊर्जा ही रिफ्लेक्टरमुळे केंद्रित केली जाते व ती बाहेर पडू दिली जात नाही, पण यात स्वयंपाक करायला अनेक तास लागतात. त्यामुळे घाईगर्दीच्या काळात तो फारसा उपयोगी ठरत नाही. त्यात ३०० अंश फॅरनहीट (१५० अंश सेल्सियस) म्हणजे मांस शिजवण्याइतके तापमान निर्माण होते.

पॅरॉबोलिक कुकरमध्ये वक्राकार रिफ्लेक्टर बसवलेले असतात त्यामुळे अत्यंत कमी भागावर उष्णता केंद्रित केली जाते. यात ४०० अंश फॅरनहीट (२०५ अंश सेल्सियस) इतके तापमान निर्माण होते.

पॅरॉबोलिक व बॉक्स कुकर हे सहजगत्या एकीकडून दुसरीकडे नेण्यासारखे नसतात त्यामुळे पॅनल कुकर हा जास्त सोयीचा ठरतो. अगदी सहलीच्या ठिकाणीही त्याचा वापर करता येतो. ज्या गरीब लोकांना सरपण गोळा करून स्वयंपाक करावा लागतो त्यांच्यासाठी सोलर कुकर वरदान आहे. कारण त्यांना त्यामुळे पौष्टिक अन्न मिळेल व खर्चही वाचेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..