नवीन लेखन...

ताडोबात आठ पाणवठ्यावर सौर पाणपोई

उन्हाळ्यात वन्यजीव प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित जंगलात वन विभागाने निर्माण केलेल्या कूपनलिकावर ‘वॉटर इज लाईफ’ या वन्यजीव प्रेमी संस्थेतर्फे अत्याधुनिक सौरऊर्जा पंपाद्वारे कृत्रिम झरे निर्माण करून आठ ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आल्यामुळे वन्यजीवांना तृष्णा भागवता येणार आहे.

उन्हाळ्यात तलावातील पाणी आटत असल्यामुळे वन्यजीवन पाण्यासाठी गावांकडे धाव घेताना दिसून येतात. त्यामुळे उन्हाळ्यात प्राण्यांना तृष्णा भागवण्यासाठी मोहर्ली येथील आठ पाणवठ्यांवर सौर पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हे कृत्रिम झरे आता उन्हाळ्यात नैसर्गिक झऱ्यात पाणी साठवण्याचे काम करीत आहेत. यामुळे प्राण्यांना पाणी पिण्याची जागाही बदलण्याची गरज नाही, असे दृश्य आता दिसून येत आहे. यासर्व प्रयोगामुळे 50 चौरस किलोमीटर भागातील प्राण्यांची तृष्णा भागवण्यात व या प्राण्यांना उन्हापासून होणारा त्रास वाचविण्यास मदत होत आहे.

2010 पासून धनंजय बापट यांच्या पुढाकाराने मोहर्ली बफर क्षेत्रात ‘वन्यजीवांसाठी पाणपोई’ हा उपक्रम राबविला. पहिल्या तीन वर्षात टँकरच्या माध्यमातून संपूर्ण उन्हाळाभर वन विभागासोबत विविध ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत होता. चौथ्या वर्षी सहकारी मित्र डॉ. विवेक भोरे जे स्वत: मेकॅनिकल इंजीनियर व सौर ऊर्जा या विषयात डॉक्टरेट आहेत. त्यांनी अत्यंत कमी क्षमतेचा परंतु सूर्योदय ते सूर्यास्त असा पूर्ण वेळ चालणारा बॅटरी विरहीत पंप तयार करून याच क्षेत्रातील हातपंप असलेल्या कूपनलिका सोबतच हा पंप टाकून एक अभिनव प्रयोगाची सुरूवात केली. त्यामुळे मागील वर्षीपासून हाच उपक्रम अनेक सुधारणांसह सुरू करण्यात आला आहे. प्राण्यासाठी पाणी पुरवठा हा कृत्रिम सिमेंटच्या पानवठ्यात होत होता. त्यामुळे यातील पाणी संपले की जनावरे इतर ठिकाणी स्थलांतर करीत होते. सोबतच नैसर्गिक पाणवठ्यातही पाणी आटले की जनावरांना इतरत्र भटकावे लागत होते. त्यामुळे त्यांना स्थलांतरित न होता त्याच व सोबतच्या नैसर्गिक पाणवठ्यातही पाणी मिळावे म्हणून ‘वॉटर इज लाईफ’ च्या सदस्यांनी नेहमीच्या नैसर्गिक पाणवठ्यावर पाणी उपलब्ध व्हावे व त्यासाठी जमिनीच्या आत उपलब्ध असलेले पाणी जमिनीवर आणण्यासाठी पंपाचा उपयोग करून नैसर्गिक ठिकाणी सतत ताजे व शुद्ध पाणी जनावरांना उपलब्ध करून देण्यासाठी सौर पाणपोई ही योजना वन अधिकाऱ्यासमोर ठेवली. त्यामुळे या वर्षी आठ ठिकाणी तलावात कूपनलिका तयार करून दिल्या आहेत. डॉ. भोरे यांनी तयार केलेले पंप ‘वॉटर ईज लाईफ’ या गटातर्फे स्वखर्चाने बसवून देण्यात आले आहेत व त्याची दररोज देखभाल सुद्धा या गटातर्फे करण्यात येत आहे. यावर्षी या आठ सौर पाणपोई मोहर्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 188, आगरझरी कुटी कक्ष क्र. 169, फेटराबोडी कक्ष क्र. 167 चा तलाव, कालापाणी कक्ष क्र. 175 चा देवाडा तलाव 170, जुनोना कुटी कक्ष क्र. 154 अशा ठिकाणी लावण्यात आल्या आहेत.

या सर्व कामासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी राऊतकर, श्रीधर बालपाणे, संजय घोडवे, विठ्ठल लेडांगे, वन विभागाचे वनरक्षक हिंगणकर आदीचे मार्गदर्शन व मदत सतत लाभत असून वनरक्षक या सर्व उपक्रमांची देखरेख करीत आहेत. तलाव क्षेत्रात 100 फूट खोल कूपनलिका तयार करून अत्यंत कमी दरात म्हणजेच फक्त 40 हजार रूपयात ताजे, स्वच्छ पाणीपुरवठा करणारा पंप बसवून प्राण्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा उपक्रम जर संपूर्ण महाराष्ट्रात वनविभागात स्वीकृत करून राबवण्यात आला तर स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध होऊन शासनाची कोट्यवधींची बचत होईल. कारण यासर्व उपक्रमाला जवळपास 4 लाख इतका खर्च येतो. मात्र येथे फक्त 40 हजार रूपयांच्या खर्चात हे काम असून याला मनुष्यबळाची गरज नाही. सोबतच या पाणपोईमुळे प्राण्यांची पिण्याची जागाही बदलणार नाही, असे मत धनंजय बापट यांनी व्यक्त केले. ही पाणपोई प्राण्यासांठी उन्हाळ्यात वरदान ठरली आहे असेच म्हणावे लागणार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..