नवीन लेखन...

वॉटर हीटर (सोलर)

Solar water heating panel and water collector on a house roof

 

भारत हा उष्णकटिबंधातील देश असल्याने आपल्याकडे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकीचे दिवस सूर्यप्रकाश असतो. सहस्ररश्मी सूर्याची फुकट मिळणारी ऊर्जा वापरणे हा खरेतर इंधन टंचाईवरचा एक पर्याय आहे. पाणी तापवण्यासाठी आपण घरातील किमान २५ टक्के ऊर्जा खर्च करीत असतो ती वाचवता आली तर विजेचा किंवा गॅसचा वापर टाळल्याने प्रदूषण होणार नाही. सोलर वॉटर हीटर हा असाच एक पर्याय आहे. सोलर वॉटर हीटर तयार करताना जी कार्बनची निर्मिती झालेली असते ती या हीटरच्या वापराने ४-५ वर्षांत भरून निघते. सोलर वॉटर हीटरमुळे विजेच्या बिलात खूप बचत होते. अजूनतरी सोलर वॉटर हीटर महाग असले तरी हळूहळू त्यांच्या किमती कमी होत आहेत. हाऊसिंग सोसायट्या किंवा बंगले, हॉटेल्स येथे आता सोलर हीटरचाच वापर केलेला दिसून येतो. सोलर वॉर हीटरचा वापर नवीन नाही. इ.स. १८०० पासून हे तंत्र अवगत होते. त्यानंतर १८९६ मध्ये क्लॅरेन्स केम्प यांनी बाल्टीमोर सिटी येथे पहिला सोलर वॉटर हीटर तयार केला व त्याचे पेटंटही घेतले. यात सौरऊर्जेचे रूपांतर उष्णतेत करायचे असते. त्यासाठी घराच्या छपरावर किंवा टेरेसमध्ये एक किंवा दोन पॅनेल्स वापरले जातात, काही ठिकाणी नळ्यांमधून पाणी नेऊन ते पॅनलमधून फिरवतात तेथे ते सूर्याच्या उष्णतेने तापते. या नळ्यांमध्ये अँटीफ्रीझ लिक्विड वापरले जाते. त्यामुळे सूर्याची उष्णता थेट पाण्याकडे दिली जाते.
फोटो व्होल्टईक सिस्टीममध्ये २४ ते ४० पॅनल्स छपरावर बसवली जातात. जेव्हा सूर्याचे फोटॉन पॅनलवर आदळतात तेव्हा पॅनलमधील इलेक्ट्रॉन्सना धक्का बसतो व ते इतरांना धक्के देत राहतात, त्यातून ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. फोटोव्होल्टईक सिस्टीममध्ये वापरलेले सिलिकॉन सूर्याचा सर्व तरंगलांबीतील प्रकाश पकडू शकत नाही, त्यामुळे काही प्रकाश ऊर्जा वाया जाते. सोलर थर्मल सिस्टीममध्ये ६० ते ७० टक्के ऊर्जा उष्णतेत रूपांतरित केली जाते. काही सोलर वॉटर हीटरमध्ये निर्वात नलिका सौर संग्राहकात ( सोलर कलेक्टर) वापरल्या जातात. यात तांब्याच्या तारा या गरम होतात व त्याच्या जोडीला अँटीफ्रीझ असते. नंतर गोळा केलेली उष्णता ही पाण्याला दिली जाते. सोलर वॉटर हीटरचा हा प्रकार अधिक सुटसुटीत व कार्यक्षम असतो, थंडीच्या दिवसातही तो चांगले काम देतो. सोलर कॉन्संट्रेटर हा सौर संग्राहकाचा आणखी एक प्रकार आहे त्यात डिश किंवा आरसे वापरून सूर्यप्रकाश अधिक संहतीने गोळा केला जातो. चार जणांच्या कुटुंबाला दिवसाला १२५ लिटर गरम पाणी देणारा हीटर पुरेसा असतो. यात कोटिंग उच्च दर्जाचे असेल तर उष्णता वाया जात नाही. शिवाय तो पूर्णपणे सूर्यप्रकाशाच्या दिशेने असला पाहिजे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..