कधी कधी नात्यांमध्येही गम्मत असते. परंतु कळली तर ठीक नाही तर मात्र बोंब
बहुदा असेच होत असते. मला ती त्या दिवशी भेटली खरी पण अस्वस्थ होती.
साहजिक आहे लग्नाचे वय झाले होते , निघूनच गेले होते करंट सतत करिअरच्या मागे लागल्यामुळे लग्नाचा विचार ती करूच शकत नव्हती.
तिची स्वतःची जागा घेतली होती , गावातच आईबाबा रहात होते परंतु ती बहुतेक त्यांच्याच घरी रहात असे कारण तिचे जाणे येणे हे वेळेवर नसे.
ऑफिसमध्ये वरच्या पोस्टला असल्यामुळे ‘ टार्गेट ‘ नावाचा राक्षस डोक्यावर सतत असे.
घरी थकले म्हणून स्वयंपाक करीत नसे. स्वयंपाकाला बाई होती, त्याच्याकडे घराची चावी होती.
रात्री आली कि कधीकधी ड्रिंक्स आणि मग शांतपणे जेवण.
शनिवार रविवार मात्र सुट्टी असायची. तेव्हा ती अक्षरशः घरात पडलेली असायची.
पण असे किती दिवस चालणार.
ती माझी चांगली मैत्रीण होती म्हणून तिला विचारले , अरे तुझे पुढे काय ?
पुढे काय म्हणजे ? तिने सहज विचारले.
नाहीं तसे नाही , म्हणजे संसार , लग्न काही विचार केला का ?
मी सहज तिला सहज विचारले तेव्हा ती म्हणाली ,
‘ लग्न ‘ काय जोक करतोस तू. मी…आता नो लग्न झेपणार नाही मला ते . आधीच मला कोणाचे बॉसिंग झेपत नाही आणि पुढे नवऱ्याचे नो , नथिंग.तू घरीं ये एक दिवस सगळे सांगते तुला , मस्त गप्पा मारू , दुपारचाच …… नको सध्यकाळी चारच्या सुमारास ये.आम्ही आपापल्या मार्गाने परत गेलो. खरे तर मी तिने बोलावले हे विसरूनच गेलो होतो, मला पण कामे होतीच.एक दिवशी शनिवारी सकाळीच फोन वाजला आठ वाजता.पहातो तो तर तिचा फोन. खरे तर तिचा झोपण्याचा दिवस तो.मी म्हणालो यायला काय झाले काय इतक्या लवकर.नाही रे , खरे तर कालच तुझी आठवण आली होती ,म्हटले उद्या फोन करायचाच तोसुद्धा सकाळीच तुझी काही कामे आहेत का आज .काहीच नाही मलाही सेकंड सॅटर्डे आहे , सुट्टी आहे. भेटणार …हो …..कधी …चार वाजता आमच्या इथल्या सी.सी.डी . मध्ये..ओके ……
आयला हिला आज काय झटका आला आज …कोण जाणे ..बायकोपुढे सूतोवाच करून ठेवले …..आज संध्याकाळी नो फ्री….बरे झाले ती पण आजच पार्लरमध्ये जाणार होती.बायकांचे बरे असते म्हणजे त्यांचे त्याच्या डोक्यप्रमाणे चाललेले असते परंतु पुरुषांचे तसे नसते कधी यू टर्न घ्यावा लागेल हे सांगता येत नाही.
त्या दिवशी तसेच झाले , मी जो घरातून गुल झालो तो रात्री ११ ला उगवलो चुपचाप घरी येऊन झोपलो.झोप कसली लागते , मनामध्ये ती , आणि डोळ्यासमोर ही .बिझी असताना कुठलाच विचार येत नाही पण एकटे पडलो की डोक्यात सुरु ती का ही .
आम्ही मधून मधून भेटत होतो , उनाडक्या भरपूर होत होत्या. एकेदिवशी मॉल मध्ये तिच्याबरोबर गेलो तर समोर ही .क्षणभर वाटले भेटणार ती परंतु नाही भेटली.मी काही कटण्याचा विचार केला नाही.नुसतेच मित्र होतो. काही ‘ देवघेव ‘ नव्हती.मग कर नाही त्याला डर काय.उगाच मनाची समजूत घातली असा विचार करून .
एक एक लक्षात आले असे करण्यात सॉलिड थ्रिल असते.म्हणजे आपले लफडे पकडले जाऊ नये म्हणून किती आणि कशी बुद्धी वापरावी लागते ह्यासाठी जागरूक रहावे लागते.
मनामध्ये ती असते , बरोबर ही असते.सगळेच मस्त असते पण कुठपर्यंत ..काळा रंग ..डार्क काळा होऊ न द देणं हे मात्र आपल्याच हातात असत.
असच स्किल मी वापरून एकदम ‘ फास्ट ‘ आयुष्य जगत आहे ..तुमचे काय…सगळेच बहुतेक मनातल्या मनात
समथिंग डार्क , समथिंग ब्लॅक …
माझे मात्र नेहमीच ,’ समथिंग डार्क इन ब्लॅक ‘
— सतीश चाफेकर
Leave a Reply