चला चला रे, त्वरा करा, क्षण भाग्याचा हा, समीप आला ।
झटपट झटपट, झरझर झरझर, चिन्मय झाला वर्षाचा,
चिनमय झाला वर्षाचा, बाई, चिन्मय झाला वर्षाचा ।।धृ।।बोल बोबडे बोलुनि, दाडे दाडे, हात उडवितो भरा भरा,
हात उडवितो भरा भरा ।सरकत सरकत सस्मित वदनें,
येतो घसरत झराझरा,येतो घसरत झराझरा ।।
खेळ खेळुनि खेळत असतां, वाटे मजसी हवा हवा,
वाटे मजसी हवा हवा ।
खदखद हांसुनि मुदित मुखानें, भुवई उडवी सदाकदा,
भुवई उडवी सदाकदा ।।
वाटे, ईशकृपा, झाली मजवरी, जन्म जाहला रामाचा ।।१।।
टाळ्या बाई हा टाळ्या बोलुनि, खुद्कन् हसतो गालांत,
खुद्कन् हसतो गालांत ।
गोंडस ऐसे, देखुनि लोभस रुपडे, हर्ष माईना हृदयांत,
हर्ष माईना हृदयांत ।।
कुठे ठेवू मी अन् कसे त्याला, कळे न मजसि भोळीला,
कळे न मजसि भोळीला ।
इवले इवले खेळ खेळणे ते लळा लाविती जीवाला,
लळा लाविती जीवाला ।।
राहुनि राहुनि नित मनांत येई, जन्म जाहला कृष्णाचा ।।२।।
हातांवरी पट्कन् जोर देऊनि, करी उंच उंच मान,करी उंच उंच मान ।
हळू हळू अंगी येऊं लागले बळ, दिसला जरी हा सान,
दिसला जरी हा सान ।।
काम पायीं, तयां गूर ठेविता, आवाज भासे घंटानाद,
आवाज भासे घंटानाद ।।
देखुनि जिद्द तयाची मनांस वाटे, जन्म झाला शिवबाचा ।।३।।
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply