नवीन लेखन...

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री, लेखीका सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी यांना आपण संवेदनशील अभिनेत्री सोबतच एक संवेदनशील लेखिका म्हणून ही ओळखतो. तिचा जन्म ३ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला. त्यांनी अनेक वर्षे लोकसत्ताच्या “विवा” या पुरवणीचे संपादन केले, त्यात त्यांनी लिहिलेल्या “सो कूल” या स्तंभावर आधारीत त्यांच नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. व्यावसायिक आणि कलात्मक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट करतांना त्यात योग्य संतुलन त्यांनी साधले आहे. त्यांनी चित्रपट सृष्टितील आपली कारकीर्द गिरीश कर्नाड दिग्दर्शित “चेलुवी” या चित्रपटातून सुरु केली. त्यानंतर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका त्यांनी केल्या आहेत.

या चित्रपटांमध्ये “अग्निवर्षा”, “कितने दूर कितने पास”, “कैरी”, “घराबाहेर”, “जहा तुम ले चलो”, “जुनून”, “टॅक्सी नंबर ९२११”, “डरना जरूरी है”, “डॉ. प्रकाश बाबा आमटे”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर”, “दायरा”, “दिल चाहता है”, “दिल विल प्यार व्यार”, “देवराई”, “दोघी”, “प्यार तूने क्या किया”, “ब्राईड अँड प्रेज्युडिस”, “मिशन कश्मिर”, “मुक्ता”, “सखी”, “सिंघम” प्रमुख आहे. या वर्षी त्यांची प्रमुख भूमिका असणारा “अग बाई अरेच्या” हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांना “फूॅक सु डी मी” या इटालियन चित्रपटासाठी मिलान अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सावात सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी “खतरों के खिलाड़ी ” व “झलक दिखला जा” या रियलिटी शो मध्ये भाग घेऊन आपल्या एक्शन आणि नृत्य कौशल्यासाठी कौतुक मिळवले आहे. www.sonalikulkarni.org ही सोनालीची वेबसाइट आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..