नवीन लेखन...

सोनेरी राजपुत्रास पत्र…

प्रिय सोनेरी राजपुत्रा….
तू काल पहाटे अचानक मनुष्यवस्तीत आलास आणि हकनाक स्वतःचा जीव गमावून बसलास…
आम्हाला शहरामध्ये असा वन्यप्राणी आल्याचं खपत नाही, हे कदाचित तुझ्या गावीही नसावं…
आम्ही सुट्टीच्या दिवसात बंद गाडीतून अभयारण्यात तुम्हा मंडळींना पहायला येतो, तेव्हा आम्ही आमच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत असतो…
इथे तर तू आपल्या सवंगड्यांना सोडून चुकून रानटी मनुष्यवस्तीत एकटाच आलास…. त्यामुळे बिनकामवाल्या रानटी बघ्यांची गर्दी वाढत गेली….
साहजिकच तुला हे अपेक्षित नव्हतं, तू बिथरलास…ज्यांनी आयुष्यभर ‘अहिंसा’ हाच आपला धर्म मानला, त्यांच्या सोसायटीत तू आसऱ्यासाठी गेलास…तुझा कदाचित असा समज झाला की, तुझ्यावर हिंसाचार न करता ही रानटी माणसं तुला कुठेही धक्का न लावताच पुन्हा जंगलात सोडतील…
पण नाही, तुला सर्वांना डोळे भरुन पहायचं होतं, तुझे व्हिडिओ काढून ते मोबाईलवर व्हायरल करायचे होते….त्याकरता ही रानटी माणसं आरडाओरडा करीत तुझ्या पाठीमागे हात धुवून लागली…
वनखात्याला पाचारण केलं तर त्यांच्याकडे तुला पकडण्यासाठी साधनसामग्री देखील नव्हती…. ती उपलब्ध झाल्यानंतर प्रशिक्षित कर्मचारी नव्हते…. त्यांनी गुंगीचे दोनच बाण पुरेसे असताना जादा डोस असलेले तीन बाण निर्दयीपणे तुला मारले…
ओव्हरडोस झाल्यामुळे तुझ्या नाकातोंडातून रक्त येऊ लागलं… तरीदेखील या नराधमांना तुझी दया आली नाही… शेवटी तुला जाळ्यात पकडलं….पण उचलायचं कसं हा प्रश्र्न पडला. कसंबसं उचलेपर्यंत तुझ्या हृदयाचे ठोके वाढून तू निष्प्राण झाला होतास….
अवघ्या सात तासांत या माणुसकीला काळं फासणाऱ्या निर्दय माणसांनी तुला संपवून टाकलं…. तु आता एक काम कर, जंगलात फिरणाऱ्या तुझ्या मुक्त कळपांच्या स्वप्नात जाऊन सांग की, चुकूनही या रानटी माणसांच्या वस्तीत जाऊ नका…हकनाक जीव गमावून बसाल….
काल मीडियावाल्यांनी, वर्तमानपत्रवाल्यांनी तुझ्यावर ब्रेकिंग न्यूज केली. त्यांना त्यांचा टिआरपी वाढविण्यासाठी अशा खळबळजनक बातम्या आवश्यक असतात… दोन दिवसांनंतर सर्वजण अशा ‘बातमी’ला विसरलेले असतात…. आणि तू वर्तमान काळातून भूतकाळात जमा होतोस…
जंगलात तुझ्यासारख्या
मुक्त फिरणाऱ्या वन्य प्राण्यांचं ‘आनंदी जीवन’ या खुराड्यात राहणाऱ्या रानटी माणसांना कदापि कळणार नाही, हेच खरं…..
– सुरेश नावडकर १०-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..