नवीन लेखन...

सोनोग्राफी (कलर डॉप्लर)

आधुनिक प्रतिमाशास्त्रात जवळजवळ सर्वच प्रतिमा कृष्णधवलच असतात; कारण निदानातील सूक्ष्मता ओळखण्यास मानवाचे डोळे कृष्णधवलातच सर्वात जास्त कार्यक्षम असतात. रंगांचा उपयोग सौंदर्यासाठीच असतो. परंतु सोनोग्राफीमध्ये रंगीत प्रतिमांचा उपयोग करण्यात आला, त्याला कलर डॉपलर हे नाव देण्यात आले. यामध्ये मोठ्या धमन्या (आर्टेरी) व नीला (व्हेन्स) यामधील वाहणार्‍या रक्ताचा प्रवाह याचा व दुसरे वाहणारे द्रवपदार्थ यांचा अभ्यास केला जातो.

या शास्त्रात प्रोबकडे वाहणारा प्रवाह लाल तर प्रोबपासून दूर वाहणारा प्रवाह निळा दिसतो व प्रवाहाला अडथळा आल्यास कलर बदलतो. याचा मुख्यत: उपयोग रुंद अथवा अरुंद झालेल्या व्हेसल्स यांचा अभ्यास व साक्षात हृदयाचा अभ्यास करण्यात होतो. रंग, गती, आवाज या तिन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले जाते. धमनी अथवा नीला अरुंद झाली असेल तर फ्लो वाढतो व पल्स डॉप्लर हाय पीच आवाज येतो. अर्थात अरुंद भागाच्या पलीकडे प्रोब असल्यावर असा आवाज येतो. तर रंगांमध्येदेखील बदल होतो व कॉम्प्युटर, गती वाढलेली आहे, अशी नोंद देतो. अरुंद होणार्‍या धमन्यांमुळे हातापायांना गॅंगरिन होते व हे अवयव पूर्णपणे निकामी होऊन काढून टाकावे लागतात. हृदयाच्या झडपा, हृदयाच्या धमन्या व नीला, हातापायाच्या रक्तवाहिन्या, पोटाच्यारक्तवाहिन्या, मूत्रपिंड व गर्भाच्या रक्तवाहिन्या यांचा अभ्यास कलर डॉप्लर करतो.

लहान वयात होणारा रक्तदाबाचा त्रास मुत्रपिंडाच्या अरुंद झालेल्या धमनीमुळे असू शकतो. व हे निदान कलर डॉप्लरने त्वरीत होते. ट्यूमरमध्ये होणारा रक्तपुरवठा रेझिस्टिव्हीटी इंडेक्सवरुन जर जास्त दिसला, तर तो ट्यूमर कॅन्सरचा असू शकतो. पुरुषांमध्ये अंडाशयाला एकदम पीळ बसणे (टॉरशन टेस्टीज) हा रोग डॉप्लर पटकन ओळखतो. यामध्ये रक्तपुरवठा साफ बंद झालेला दिसतो व हे अंडाशय वाचवता येते. बाळंतपणामध्ये गर्भाला वारा (प्लासेंटा) कडून होणारा रक्तपुरवठा याचा अभ्यास करता येतो. तसेच गर्भाच्या गळ्याभोवती चुकून असणारी नाळ दिसून येते. व यामुळे प्रसूतीमधील मोठा अडथळा आधीच दिसून येतो.

पायांमध्ये होणार्‍या नीलांचे जाळे यामध्ये होणारा अडथळा कलर डॉप्लरवर दिसून येतो. अशा प्रकारे रक्तवाहिन्यांमधील जवळजवळ सगळ्याच रोगांचा अभ्यास होऊन लवकरात लवकर निदान होते. रक्तवाहिन्यांचा सखोल अभ्यास करण्यास अॅंजिओग्राफी उजवी ठरते, ती आपण पुढे पाहणार आहोत.

— डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे

डॉ. श्रीकांत राजे
About डॉ. श्रीकांत राजे 21 Articles
ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट. एक्स-रे आणि सिटी स्कॅन या विषयांतील तज्ज्ञ. मेडिव्हिजन या डायग्नॉस्टिक्स सेंटरचे संचालक. “मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे लेखक. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..