सोनसळी चोळी माझी,वरती बिलोरी ऐना,
भल्या भल्यांची अरे राजा,
करते कशी मी दैना,
पिवळाजर्द घागरा माझा,
त्यावर नक्षीदार बुट्टे
भोवती चंदेरी ओढणी,
त्यावर निळेशार चट्टे,–!!!
शेलाटी अंगकाठी,
आखीव की बांधा,
नाजूक नार नवेली,
होईल प्रीतिची बाधा,–!!!
नाक माझे चाफेकळी,
रंग गोरा गोरा,
पाहणारा हरखून जाई,
असाच रंगेल तोरा,–!!!
केतकी स्पर्श माझा,
मृदू मुलायम चंपाकळी,
जो तो पडे या मोहा,
चटकन जातसे बळी,–!!!
नयनबाण मारते,
तीर बसे नेमका,
आरपार काळजाच्या,
घायाळ करते सारखा,–!!!
फुलाफुलावर विहरे भुंगा,
माझा पिंड केवड्याचा ,
भोवती नाग सापांचे विळखे,
दरारा असे मात्र त्याचा,–!!!
नाच फैनेदार माझा,
पाहून किती कोसळती,
हृदय घेऊन हातां,
नाचती अवतीभोवती,–!!!
संपले सोळावे नुकते,
काढला तारुण्याचा फणा,
जादूभरली नजर माझी,
का तू जपून राहीना,–???
करते क्षणात वश,
अशी जवानी भारदस्त,
हिशोब दाखवू नका,
इतके सगळे परास्त,–!!!
माना उंचावून काय पाहता,
पायी माझ्या भिंगरी,
येथे गर्दी करता तुम्ही,
नाच पाहण्या समदी,–!!!
हिमगौरी कर्वे.©
सोनसळी आणि बिलोरी ऐना याचा अर्थ काय