उत्साहाने आला होता, मुंबई बघण्याकरिता,
रम्य स्थळांना भेट देणे, ही योजना मनी आखता ।।१।।
मान्य नव्हती त्याची योजना, नियतीच्या चाकोरीला,
पाकीट पळवूनी त्याचे, घाला कुणीतरी घातला ।।२।।
धन जाता हाता मधले, योजना ती बारगळली,
अवचित त्या घटनेने, निराशा तेथे पसरली ।।३।।
जात असता सरळ मार्गी, दुष्टपणाला बळी गेला,
समाजाला धडा शिकवण्या, सूडाने तो पेटून गेला ।।४।।
वाम मार्गी जावून त्याने, तेच धन पुन्हा कमविले,
सूड घेतला असून देखील, समाधान ते नाही लाभले ।।५।।
दुष्ट वृत्तीची वलये ती, फिरत असती सभोवती,
सूड अहंकार लोभही, त्यानाच गतीमान करती ।।६।।
एका वरचा राग तुम्ही, फैलविता सहजपणे,
तोडून टाका ही वलये, प्रेम दया या भावनेनें ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply