नवीन लेखन...

सूप

तुमचा काही तरी गैरसमज होतो आहे. मी सूप वगैरे करत नाही. पण ज्या गोष्टी मुळे मला संसाराचे सार समजले आहे त्यातील एक म्हणजे सूप त्याच्या बद्दल सांगायचे आहे
1) घराला उंबरठा: म्हणजे लक्ष्मण रेषा असते. ती ओलांडून जाता कामा नये याची सतत जाणिव करुन देणारी
अनुभवी.आणि अधिकार वाणीने जरब बसवणारी एक मोठी व्यक्ती घरात असायलाच हवी. याच उंबरठ्यावरचे माप ओलांडून आलेली गृहलक्ष्मी घर सोडून जाता कामा नये.
2) पाट्याला वरवंटा: यावरचे वाटण गोड असो की तिखट याचा विचार न करता. सर्व ताकद पणाला लावून एकजीव करणे महत्त्वाचे असते. हे काम फक्त तीच करु शकते. त्यामुळे घरातील अनेक वृत्तीची माणसं असतात. त्या सगळ्यांना बांधून ठेवावे लागते. म्हणून सर्व ताकद पणाला लावावी लागते
3) उखळाला मुसळ: एखादे धान्य त्यावरील सोलपट काढायचे असेल तर ते उखळात घालून हळुवारपणे लहान लहान घाव घालून ते स्वच्छ करावे लागते. यासाठी घरातील एक स्री काही बाबतीत खंबीरपणे उभे राहून न दुखवता घरातील काही लोकांचे दुर्गुण नाहीसे करते याचेच हे प्रतिक आहे.
4) जात्याला खुंटा: संसाराची दोन चाके एक मेकांना साथ देऊन चालत असतील तरच गाडा व्यवस्थित चालतो. पण यासाठी खुंटा मजबूतच असावा लागतो. नाहीतर जात चालूच शकत नाही ही भूमिका तोच पेलवू शकतो..
5) धान्याला सूप धान्य निवडणे: फटके मारून फोलपट दूर करणे म्हणजे प्रत्येक वेळी स्वच्छता महत्वाची असते. हे काम तिलाच करायचे आहे. चांगली गोष्ट निवडावी पारखावी खडे रुपी दुर्गुण अलवार पणे दूर करावेत. मनातील वाईट विचार फटकारुन सगळ्यांची मनं स्वच्छ करायला लागतात
तर असे हे सूपच आता माझ्या संसारातील शेवटची निशाणी शिल्लक आहे. सगळ्या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. आणि आता या सूपाची अवस्था माझ्या सारखीच झाली आहे. लहानपणी मेणवलेले सूप होते. चिंध्या जाळून त्यात कसले तरी तेल मिसळवून ते सूप दणकट असायचे. माझ्या संसाराला सुरवात झाली. आणि एका ग्रामीण भागात नोकरी करत असताना दर सोमवारी सूप गोमयीने सारवले तर महादेवाच्या मंदिरात स्वच्छता केल्याचे पुण्य मिळते अशी माहिती मिळाली होती म्हणून मी ते अगदी मनापासून करायची. पुढे शहरात आल्यावर हे अवघड झाले. म्हणून आठवडी बाजारातून एक दुहेरी विणीचे सूप आणून तेलरंगाने सारवून घेतले. आणि मध्य भागात पिवळ्या रंगाच्या सुपात लाल रंगाचे स्वस्तिक काढले होते. आणि मला अजून आठवते आहे की हे पाहण्यासाठी बऱ्याच बायका आमच्या कडे आल्या व माहिती घेऊन त्यांनी पण असेच रंगवली होती सूपं. मला वाटते की असेच एक दोन वेळा केले होते. सूनबाईनी याच सुपात धान्य निवडले होते हे पाहून समाधान वाटले होते पण आता त्याच सुपाची दोन्ही कडची बाजू खिळखिळी झाली आहेत. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेले पत्र्याचे किंवा ते काही तरी नवीन निघाले आहे. त्याचे सूप येइल आणि जणू माझेच अस्तित्व संपुष्टात येईल. जेंव्हा कधी ते सूप दिसते तेव्हा मला ते दिवस आठवतात किती निगुतीने मोठे सूप आणि उपवासासाठीचे लहान सूप मी किती श्रद्धेने सारवून बघत होते. आणि अशाच एका पंरपंरेनुसार मी सोळा सोमवारचे उद्यापन केले होते तेंव्हा सोळा सुपलीतून सूप वाण दिले होते. पूर्वी सूपातूनच कोरडे धान्य भिक्षेकरींना झोळीत दिले जाई. असे हे सूप फारच महत्वाचा भाग आहे संसारातला.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..