नवीन लेखन...

एसओएस (SOS) चिल्ड्रेन्स व्हिलेज, परगुरपाडा, अलिबाग

खरी समाजसेवा ही कुठल्याही जात, रंग, धर्म, वंश, प्रादेशिकतावाद किंवा अगदी राष्ट्रवाद या पारंपारिक बंधनांच्या पलीकडची असते. कारण मानव कुठलाही आणि कसाही आणि कसाही असो त्याच्या गरजा आणि समस्या सारख्याच असतात अनेक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आज भारतातील विविध स्तरांमधील लोकांसाठी कार्यरत आहेत, आणि समाजसुधारणा क्षेत्रातील अनेक विकासकामांना आज गती आणि जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे. या संस्था कुठल्याही राजकीय किंवा सरकारी वरदहस्ताशिवाय भारतात सामाजिक क्रांती घडवत आहेत, आणि ही संस्था अशाच एका आंतरराष्ट्रीय संघटनेचे अपत्य आहे, जी आजच्या भारतातील अनेक आपत्तीग्रस्त भागांमध्ये गरिब मुलांसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी झटत आहे. ज्या मुलांनी आजवर शाळेचा उंबरासुध्दा पाहिलेला नाही किंवा ज्या मुलांना आजवर परिस्थितीचे चटकेच मिळाले आहेत, अशा मुलांच्या शिक्षणाची आणि व्यक्तिमत्व विकासाची जबाबदारी SOS ने आपल्या शिरावर घेतली आहे. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण, अतिशय आधुनिक उंची आणि टुमदार घरे, प्रत्येक घराच्या परसात मुलांनी आणि त्यांच्या आयांनी खपून बनवलेली बागए मुलांसाठी खेळाचे मैदान, वाचनालय, कॉम्प्युटर लॅब गरिब मुलांवर आणि त्यांच्या आयांवर संस्कार करण्यासाठी नेमलेले MSW तज्ञ कधी शाळाही न बघितलेल्या मुलांना प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी बांधलेली लहान शाळा, अशा सर्व सोयी-सुविधांनी नटलेल्या पर्गुरमधील SOS CHILDREN’S VILLEGE या संस्थेने गरिब आणि गरजु मुलांच्या अनिश्चित आयुष्यांना परिसस्पर्श देवून त्यांना रूळावर आणण्याचे काम केले आहे. SOS हे अनाथालय नसून ते सर्व गरिब आणि गरजू मुलांचे तसेच स्त्रियांचे प्रेमळ कुटुंब आहे व या कुटूंबामधील सर्व सदस्य एकमेकांना सहाय्य करून आणि समजावून घेवून उदयाच्या मजबूत आणि समृध्द भारताचा पाया नि र्माण करत आहेत. ज्या मुलांनी स्वप्नांतसुध्दा अशा ओघवत्या, संकटमुक्त, आणि सुरेख आयुष्याची कल्पना केली नसेत, असे आयुष्य ते या संस्थेत अनुभवतात आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटण्यास शिकतात. या संस्थेला मुद्दाम गावाचे रूप देण्यात आले आहे, ज्या गावात आधुनिकतेचा आणि पारंपारिकतेचा उत्तम मिलाफ साधला गेला आहे. येथील प्रत्येक घर हे सर्व अद्ययावत सोयींनी परिपुर्ण असुन या घरांमध्ये टी.व्ही, पलंग, फ्रीज, अॅक्वागार्डचे पाणी, आणि दर महिन्याच्या हिशोबाने भरली गेलेली साठवणीची खोलीए ज्यात सर्व खाद्यपदार्थांचा आणि इतर गृहपयोगी वस्तूंचा समावेश केला जातो असे चित्र आपणास पाहायला मिळते. या प्रशस्त आणि हवेशीर घरांमध्ये एक आई आणि ६ ते १० मुलांच्या राहण्याची सोय केलेली असते. या मुलांच्या वैयक्तिक स्वच्छतेबद्दल, आरोग्याबद्ल, वर्तणुकीबद्दल तसेच शैक्षणिक प्रगतीबद्दल त्यांच्या आया अतिशय दक्ष आणि जागरूक असतात. येथील बहुतांश मुलं ही अनाथ असल्यामुळे आणि त्यांना नेमून देण्यात आलेल्या आया या विधवा, घटस्फोटीत किंवा अविवाहीत असल्यामुळे साहजिकच या मायलेकरांमध्ये अतिशय सदर, घट्ट, आणि जिव्हाळयाचं नांत निर्माण होतं. कुठल्याही रक्ताच्या नात्याइतकच ते भावनिक आणि कणखर असतं. मुलांना त्यांची हरवलेली आई आणि तिच्या हृदयातील ओलावा मिळतो, तर आयांना त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणारी लेकरं मिळतात. अशाप्रकारे अनेक एकाकी स्त्रिया आणि अनाथ मुलं यांच्यामध्ये साकव बांधण्याचे कार्य केले आहे. या मुलांना इथे फक्त आईच मिळत नाही तर खेळायला आणि आयुष्यामधला आनंद वाटायला समवयीन सवंगडी भेटतात, सगळी गुपित आणि दुःख सांगायला दादा मिळतो, मन हलक करायला आणि प्रेम करून घ्यायला ताई मिळते आणि ऐकूणच त्यांच्या बेसूर आयुष्यात नवा सूर मिळतो, नवी चाल मिळते. म्हणूनच तर जेव्हा या संस्थेत वाढलेल्य मुली जेव्हा लग्न करून सासरी जातात, तेव्हा माहेरपणी आणि बाळंतपणाच्या वेळी त्या पुन्हा इथेच येऊन राहतात. डॉ.चांदोरकर हे बालरोग तज्ञ, डॉ.वैभव देशमुख आणि नानावटीचे काही डॉक्टर या संस्थेला नियमित भेट देवून या मुलांच्या आरोग्याकडे आणि परिसरामधील स्वच्छतेकडे जातीने लक्ष देतात. या संस्थेतील सर्व मुले ही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी आसपासच्या शाळेत जातात, त्यांची बुध्दिमत्ता, विशेष आवड आणि प्राविण्य पाहून मग त्यांना बाहेरगावी, चांगल्या महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणाकरिता पाठवल जातं. तिथली त्यांची शिकण्याची व राहण्याची सोय, आणि खर्च संस्था करते. महाविद्ययलीन शिक्षण झाल्यानंतर त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन केल जात, आणि नोकरी लागून त्यचा पहिला पगार त्यांच्या हातात पडेपर्यंत लागणारा सगळा खर्च ही या संस्थेची जबाबदारी असते. त्यामुळे केवळ बी पेरून ही संस्था निश्चित होत नाही, तर त्यांच हिरवगारं झाड होवून त्याना पहिल रसाळ फळ लगडण्यापर्यंत त्यांची सर्व काळजी घेतली जाते. अगदी हा पगार मिळाल्यानंतरसुध्दा तो एखाद्या बँकेत जमा करून सेव्हिंग खात उघडल जात आणि या रक्कमेच्या दुप्पट रक्कम त्या मुलाल त्याचा संसार थाटण्याकरिता भेट म्हणून दिली जाते.

संध्याकाळच्या मोकळया हवेत या संस्थेच्या मैदानात अनेक मैदानी, काही स्मसाशक्तीचे तर काही नुसतेच मजेचे खेळ रंगतात. सकाळी उठल्याबरोबर सर्व मुलांची प्रार्थना आणि योगासनांचे प्रकार होतात. सुट्टीमध्ये या मुलांना विविध व्यवसायांची माहिती देवून त्यांच सामान्यज्ञान वाढवण्याचा प्रयतत्न तर केला जातोच, याशिवाय त्यांच्यामधील विशेष कौशल्यांचा वेध घेण्याचासुध्दा प्रयत्न केला जातो. अनेकदा इतर शाळांमधील शिक्षक आणि मुलं या संस्थेस भेट देतात आणि या मुलांबरोबर गोष्टी, गाणी आणि विविध अनुभवांची देवाण घेवाण करतात. दरवर्षी होणार्‍या स्नेहसंमेलनामधील विविध उपक्रमांमुळे आणि कार्यक्रमांमुळे या मुलांच्या व्यक्तीमत्वामधील अनेक छुप्या कलागुणांच्या पाकळया उमजत असतात. SOS ही समाजसेवी संस्थेपेक्षा जास्त कुटुंब असल्यामुळे सुजाण पालक जसे आपल्या मुलांवर विविध प्रकारचे संस्कार करतात, आणि त्याला प्रत्येक प्रकारच्या आंतरिक व बाहेरील वादळापासून वाचवतात, अशाच प्रकारच उबदार संरक्षण इथल्या प्रत्येक मुलाला दिल जातं.

— अनिकेत जोशी

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..