लता वृक्ष वेली सा-या
नटल्या घालून आभूषणे
निसर्ग निर्मित हे दागिने
मोहक रत्नजडीत देखणे
स्वर्गातील भासती जणू
आल्या अप्सरा धरणीवर
गर्भरेशमी वस्त्र हिरवे
घाली त्यांच्या सौंदर्यात भर
कुंतल मोकळे तलम
रेशमी झुलती वा-यावर
पदन्यास करत धरती
ठेका झाडे तालावर
झुबे डुलते कानातले
थिरकती पायीची पैंजणे
करी गारुड मनामनावर
यांच्या या रुपाचे चांदणे
पांथस्थाला घाली भूल
हा सौंदयाचा चकवा
डोळ्यांचे फेडतो पारणे
शृंगार नित्य नवा
प्रज्ञा करंदीकर
बंगळुरु
र.स.९ः००
Leave a Reply