नवीन लेखन...

सोयाबिन

शहरात राहणार्‍यांनी सोयाबिन हे नाव ऐकल आहे का?

नाही..

बरं सोया हे तेलाचे नाव ऐकल का? आता उत्तर हो येईल.

मी एक पोलीस आहे आज घरून नीघालो एक फोन आला खामगाव Market जवळ खुप गाड्यांची गर्दी जमा झाली असुन संपुर्ण रस्ता बंद झाला आहे .मी आणी माझे सहकारी पोचलो तर 300/400 छोट्या मोठ्या गाड्या market समोर रांगा लावलेल्या दीसल्या सहज वीचारल तर प्रतेक गाडीत सोयाबीन. शेतकरी बांधावानी वीकायला आनलेले. भाव वीचारला 2200 /2500 असा.(हाच भाव पाच वर्षे आगोदर पन होता.पन त्यावेळी सोया तेलाचा भाव 40/45 रूपैय होता.पन सोयाबीनचा पाच वर्षा आगोदरचा भाव आज शेतकरी भावाला मीळतोय. पन तेलाचे भाव आज 70ते75रूपय हा विरोधाभास नाही का?

कच्चा माल आतीश्य स्वस्त आणि त्या पासुन बननारा माल पाच पट माहाग कारन कच्चा माल गरीब,असंघटीत अश्या शेतकरी वर्गाचा ) गाड्यावाल्याना वीचारले कोठुन आलात बरेच सांगत होते की मेहकर, जानेफळ, बुलडाणा,शेगाव,नांदुरा, मलकापुर आणी इतर बर्याच गावावरून. आलेला माल माती मोल कीमतीत वीकल्या जात होता तरी शेतकरी रांगा लाऊन उभा.

काय करनार वीदर्भ मराठवाडा गेल्या चार ते पाच वर्षा पासुन दुष्काळात होर पाळतोय. या वर्षी पाऊस बरा झाला सोयाबीन एक मात्र नगदी पीक.त्याच्या भरोश्यावर दीवाळी, उसनवारी, कर्ज, मुलांचे ,शिक्षण आणी बर्याच गोष्टी .गाडीत माल भरला खामगावला चांगला भाव मीळतो म्हणुन आनलेला. बाजारात भाव नाही वापस नेता येत नाही. आगोदर खर्च खुप झालेला. व्यापारी जो भाव देइल तो भाव घेतल्याशिवाय पर्याय नाही. शेतकरी बांधावाच्या जीवावर मोठी झालेली संघटना मुंग गीळून चुप का? निवडनुकी च्या अगोदर ईव करेगे टीव करेगे म्हननारे आता कुठ आहेत .

आपण जगतो आहोत ते शतकर्य च्या भोरोश्यावर. शेतकरी पीकवतो तेंव्हा आपल्या ताटात असत. शेतकरी जगला पाहीजे. लाखांचा पोशींदा जगला पाहिजे. सरकारला म्हना पेट्रोल शंभर रूपय करा.दारू ,सिगार,बुट इतर चैनीच्या वस्तू चे भाव दीडपट करा नोकरदार वर्गाला एका महीन्याचा पगार कमी द्या. शेतकरी बांधवाच्या सोयाबीनला भाव द्या …….

मित्रांनो आपण चिनचे सामन न घेन्याची चळवळ ऊभी केली त्याची दखल चीनला घ्यावी लागली…तसी ताकत आपल्याला सोशल मीडीयावर शेतकरी बांधवासाठी ऊभी करावी लागे मी छोटासा प्रयत्न सूरूकेला आहे .आप नाहाक चुटकुले पाठवतो आज शेतकरी भावाची व्यथा पाठवा….

कारन हे सरकार ….. what’s up, Facebook च सरकार आहे.याला या मार्फत माहीती लवकर समजते…

— तुकाराम लांडे 

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..