सृष्टीचे हे ऋतुचक्र अविरत
अविश्रांत युगानुयुगे चालले
चंद्र , सूर्य, ग्रहगोल ,पंचभुते
चराचरी दिगंतरी दृष्य रंगले ।।१।।
किती पाहिले किती भोगले
तरी अजूनही बरेच राहिले
जगण्याचे , कित्येक सोहळे
ओठी रिमझिमते गीत हळवे ।।२।।
सुखदा सारी मिठीत घेऊनी
मुक्तीच्या अवीट महासागरी
तृप्त डुंबावेसे , मनास वाटते
स्पर्श भावनांचे जीवा आगळे ।।३।।
ऋणानुबंध ! सारे गतजन्मीचे
अनामिकाचीच किमया सारी
अगम्य साऱ्या या प्रीतभावनां
हेच जीवनांती , सत्य उमगले ।।४।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ८४.
२४ – ६ – २०२१.
Leave a Reply