येता पहाट चैतन्याची
जीव अलवार जागतो
प्रसवता किरण रविचे
आत्मा, ब्रह्मांडी रमतो…
स्पर्श जाणिवांचा नित्य
मनभावनांशी खेळतो
इच्छा प्रत्येकाची वेगळी
जो तो स्वसुखा शोधतो…
कालचक्र हे पूर्वकर्माचे
जीव नित्य इथे भोगतो
क्षण सारेच अनोळखी
ओंजळीत झेलित राहतो…
जीवाजीवा उद्याची चिंता
हा बेभरोसा असह्य होतो
नियती चक्र सांजाळणारे
अंतरी अंधार दाटुनी येतो…
–वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र.२१०
२०/८/२०२२
Leave a Reply