लाभला जीवा निखळ मैत्र
सुखावलो सदासर्वकाळ
सुखही होते , दुःखही होते
भोगभोगले प्रारब्धाचे खेळ…..
भाळी पान्हाच मातृत्वाचा
निर्भयी आधार पितृत्वाचा
नव्हती कशाची खंतवेदना
स्पर्श निर्मली सात्विकतेचा….
अंगणीचा सडा संस्कारांचा
मीत्वास , दूर सारित राहिला
नुरली अपपर भावनां अंतरी
बीजांकुर मानवतेचा रुजला….
लागला जन्म सारा सार्थकी
जाणवला साक्षात्कार ईश्वरी
ब्रह्मातची ब्रह्मनाद ब्रह्मानंदी
गीतातुनी स्त्रवली मधुर पावरी….
रचना क्र.
१३१/१/१०/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
( 9766544908 )
Leave a Reply