स्पर्शातून नस ओळखणारा डॉक्टर…. स्पर्शातून आजाराचे निदान
रुग्णाचे रिपोर्ट न बघता. औषध न देता ..अल्प दरात गोरगरीबांवर मोफत उपचार
हिंदुस्थानात कायरोप्रॅक्टिक डॉक्टरांची संख्या केवळ तीनच आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि बंगलोर येथे हे डॉक्टर सध्या आपली सेवा देत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव डॉ. नारायण कनाल हे आपल्या आगळय़ावेगळय़ा उपचार पद्धतीतून रुग्णांची गेली अनेक वर्षे सेवा करीत आहेत.
वैद्यक शास्त्रातील कायरोप्रॅक्टिक ही जगातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रणाली म्हणून ओळखली जाते. १८ सप्टेंबर १८९५ या दिवशी जगाला उपयोगी ठरणाऱया कायरोप्रॅक्टिक शास्त्राचा शोध लागला. वांद्रे येथे राहणारे डॉ. कनाल यांनीही या विषयात वैद्यकीय पदवी घेतली. हिंदुस्थानात कायरोप्रॅक्टिक डॉक्टरांची संख्या केवळ तीनच आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव डॉ. नारायण कनाल. आपल्या उपचार पद्धतीतून रुग्णांची गेली अनेक वर्षे सेवा करीत आहेत. शस्त्रक्रिया तसेच कोणत्याही औषधाशिवाय रुग्णांना पूर्ण बरे करण्याचा विडाच डॉ. कनाल यांनी उचललेला आहे. शरीरातील नसांवर विशिष्ट दाब देऊन डॉ. कनाल रुग्णांवर इलाज करतात. आजवर डॉ. कनाल यांनी रुग्णवाहिकेतून आलेल्या रुग्णांना आपल्या उपचार पद्धतीतून ठणठणीत बरे करून पाठवले आहे. याशिवाय सिनेकलाकार,राजकीय नेते तसेच क्रिकेटर्स आपली व्याधी दूर करण्यासाठी डॉ. कनाल यांचाच दवाखाना गाठतात.
कानाच्या विकाराने त्रस्त असलेल्या सतीश परळीकर यांना ऐकूच येत नव्हते. उपचारासाठी त्यांनी अनेक वैद्यकीय दवाखाने पालथे घातले. स्पेशालिस्ट डॉक्टरही गाठले, पण औषधाची मात्रा काही लागूच पडत नव्हती. अखेर केवळ स्पर्शातून आजाराचे निदान करणाऱया डॉक्टरांचा पत्ता सापडला व ७५ वर्षांच्या परळीकर यांनी थेट नसतज्ञ डॉ. नारायण कनाल यांचा दवाखाना गाठला.
सर्व्हायकल स्पॉण्डिलायसिसने त्रस्त असलेल्या परळीकरांच्या नसांवर दाब देत उपचार करीत डॉ. कनाल यांनी चमत्कार केला. परळीकर यांची व्याधी दूर झाली. त्यांना दोन वर्षांनंतर ऐकू येऊ लागले.
मानदुखी, कंबरदुखी, फ्रोजन शोल्डर, स्लिप डिस्क, हेड पेन, सायटिका, मसलपेन, लेग आणि आम पेन, नी पेन, आरर्थीस्ट, स्पोर्ट इंज्युरी, दृष्टीविकार व पंचनसंस्थेचे विकार यावर कायरोप्रॅक्टिक चिकित्सा पद्धतीद्वारे उपचार केले जातात. केवळ मसाज व नसांवर दाब देऊन मानदुखी, कंबरदुखीच्या व्याधींपासून अनेक वर्षे त्रस्त असलेल्या रुग्णांना डॉ. कनाल यांनी आपल्या उपचार पद्धतीद्वारे दिलासा दिलाय.
रुग्णाचे कोणतेही रिपोर्ट न बघता किंवा कोणतेही औषध न देता अत्यंत अल्प दरात शिवाय गोरगरीबांवर मोफत उपचार करून डॉ. कनाल यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. एवढेच नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांसाठी डॉ. कनाल यांनी आजवर अनेकदा वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून मोफत उपचार केलेले आहेत. डॉ. कनाल यांच्या किमयागार उपचार पद्धतीमुळे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परदेशातूनही रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात.
त्यांच्या उपचाराची संधी आता मुंबईसह ठाणेकरांनाही मिळत आहे. ठाणे तलावपाळी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत मंगळवार, शुक्रवार, रविवार सकाळी ९.३० ते दुपारी १; दादर शिवाजी पार्क येथील मलिक इमारतीत असलेल्या सापळे पॉलिक्लिनिक येथे सोमवार, बुधवार, शनिवार या दिवशी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत तर वांद्रे येथील सेंट मार्टिन्स रोड, महापालिका एच वॉर्डच्या बाजूला असलेल्या डॉ. फारुकी पॉलिक्लिनिक येथे सोमवार ते शनिवारी संध्याकाळी ५ ते ८.३० या वेळेत रुग्णांना उपचार घेता येतील. अधिक माहितीसाठी डॉ. कनाल यांच्याशी ९८२१२६७२६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
— संतोष द पाटील
Leave a Reply