आमच्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी पूर्वी मी खूप मोठी सजावट करीत असे. शेकडो मंडळी आवर्जून भेट देत असत. पण आता अशी सजावट वयोमानानुसार शक्य होत नाही. तरीही गणेशोत्सव आला की आतली उर्मी मला शांत बसूही देत नाही. मग थोडीशी सजावट करतोच !
या वर्षी सजावटीबरोबरच माझ्या संग्रहातील काही वेगळ्या वस्तूही मांडल्या होत्या. गणपतीबाप्पाला लाल मखमली कुंची ( ही आता कालबाह्य झाली आहे ) , कडांना छोट्या पितळी घंटा लावलेला वेगळा पाट, हाताने अत्यंत सुंदर कोरीव काम केलेले तांब्याचे तांब्याभांडे , अगदी वेगळे असे राजेशाही ” उदबत्तीचे घर “, ३ – ४ इंचाचे तांब्याभांडे- ताम्हन – पळी – जर्मन सिल्व्हरची पंचपात्री असा छोटा संच इत्यादी गोष्टींनी ही सजावट आणखीनच सजली होती.
त्याचीच ही एक झलक !
” तुम्हा तो हेरंब सुखकर हो “!!
— मकरंद करंदीकर
Leave a Reply