रस्त्यांवर अनेक अपघात हे वाहनांच्या अतिवेगाने होत असतात, त्यामुळे अशा वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी खरे तर स्पीड गन लावणे हा चांगला उपाय आहे.
कुठल्याही वाहनाचा शहरातील वेग किती असावा, महामार्गावरील वेग किती असावा याच्या वेगमर्यादा ठरलेल्या आहेत त्यांचे पालन करण्यासाठी या साधनाचा उपयोग केला जातो. कुठल्याही वेगवान वस्तूचा वेग किती आहे हे शोधण्यासाठी डॉप्लर रडार युनिट वापरले जाते त्यालाच स्पीड न असे म्हटले जाते. स्पीड गन किंवा रडार गनचा शोध ब्राईस के हार्डिक यांनी लावला व ती पहिल्यांदा शिकागोत वापरण्यात आली. ही गन ज्या वेगवान वस्तूच्या दिशेने रोखलेली असते त्या दिशेने रडारचा रेडिओ संदेश जातो व आपटून परत येतो, तेव्हा रेडिओ संदेशाची फ्रिक्वेन्सी बदलते.
जाणाऱ्या रेडिओ सिग्नलची फ्रिक्वेन्सी व आलेल्या रेडिओ सिग्नलची फ्रिक्वेन्सी यातील फरक हा वस्तूच्या वेगाच्या प्रमाणात असतो, त्यामुळे हा डॉप्लर शिफ्ट मोजून त्या वस्तूचा वेग ठरवता येतो. यात स्पीड गन पोलीस हातात धरून एखाद्या वाहनाचा वेग काढू शकतात. रस्त्यावर उंच ठिकाणीही ते स्टँडवर लावता येतात. स्पीड गनमध्ये एक्स, के, आयआर केए, बँड वापरले जातात. युरोपात केयू बँडचा वापर केला जातो. डॉप्लरला पर्याय म्हणून लिडार हे पल्स्ड लेसर लाईट तंत्र वापरले जाते. एखाद्या रिकाम्या विहिरीत तोंड खाली घालून ओरडले तर काय होईल, थोड्या वेळाने तुमच्या आरोळीचा प्रतिध्वनी तुम्हाला ऐकू येईल. तुमचा आवाज विहिरीच्या तळाशी जाऊन परत प्रतिध्वनी तुमच्या कानापर्यंत यायला ठराविक वेळ लागतो.
ध्वनीचा प्रवासाचा वेग हा सेकंदाला १००० फूट असतो. लेसर गनमध्ये हा राऊंड ट्रिप टाईम म्हणजे लेसर मोटारीवर आदळून परत येण्याचा वेळ मोजतात. लेसर स्पीड गनमधून निघालेला किरण हा ध्वनीपेक्षा जास्त वेगाने म्हणजे सेकंदाला नॅनो सेकंदाला एक फूट वेगाने जातो, लेसर गनने सोडलेला इन्फ्रारेड लेसर किरण वाहनावर आपटून परत येण्यास जितके नॅनोसेकंद लागतात त्याला दोनने भागितले की, अंतर कळते. असे अनेक नमुने घेऊन अंतरातील बदल काढतात व त्यावरून मोटारीचा वेग काढला जातो.
ही लेसर गन अचूक असली तरी ती विशिष्ट वाहनांवर रोखावी लागते, रडार गन जी डॉप्लर शिफ्टवर चालते ती रोखावी लागत नाही.
Leave a Reply