मसाल्यांच्या पदार्थांच्या घटकांचे विश्लेषण बघितले तर पुढील गोष्टी लक्षात येतात. मसाल्याच्या सर्व पदार्थात कॅल्शिअम व फॉस्फरस भरपूर आहेत. हाडांच्या व दातांच्या बळकटीसाठी, स्नायू आकुंचन पावण्यासाठी व मज्जातंतूंच्या कार्यासाठी व रक्त साकळण्यासाठी कॅल्शियम उपयोगी. कॅल्शियम मोठ्या
आतड्याच्या कर्करोगाला प्रतिबंधक. लोह सर्व मसाल्यात विशेषतः हळद, आमचूर, हिंग, जायपत्री व जिरे यात जास्त असते. तांबड्या पेशीतील हिमोग्लोबिनसाठी आवश्यक. पंडुरोग होत नाही. तोंडाच्या, अन्ननलिकेच्या व जठराच्या कर्करोगाला प्रतिबंधक, त्वचेच्या, आतड्याच्या काही पेशींच्या कर्करोगास प्रतिबंधक. मसाल्यात ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर असते. शरीराच्या प्रतिकारशक्तीला आवश्यक, अॅण्टिऑक्सिडंट.
कोलीन- हे एकच अमायनो आम्ल मेंदूच्या पेशींमध्ये शिरू शकते. याचा संबंध स्मरणशक्तीशी असतो. अल्झहायमर्स (विस्मृती) या रोगावर प्रतिबंधक म्हणून कोलीनवर प्रयोग चालू आहेत. वेलची, धणे, कोथिंबीर, जिरे, मेथीच्या बिया व मोहरी या पदार्थात कोलीनचे जास्त प्रमाण, जस्त हे अन्ननलिकेच्या कर्करोगाला प्रतिबंधक तर तांबे स्तनाच्या, फुफ्फुसाच्या व थायरॉईडच्या कर्करोगाला प्रतिबंधक, मँगनीज व मॅग्नेशियम ही खनिजे विकरांच्या (एन्झाईम) निर्मितीसाठी व पचनासाठी आवश्यक आहेत व ती मसाल्यात भरपूर आहेत. अन्नाचे पचन नीट झाले की त्यातील अनावश्यक चोथा आतड्यातून पुढे ढकलला जातो व बद्धकोष्ठता टळते. हा चोथा मोठ्या आतड्यात जास्त वेळ न राहिल्यामुळे कर्करोगाचे भय कमी होते. भाज्या, कडधान्ये इत्यादींपेक्षा मसाल्याचे पदार्थ रोजच्या स्वयंपाकात कमी प्रमाणात असले तरी त्यातील खनिजे व सूक्ष्म क्षार यांचे प्रमाण भाज्या वगैरेपेक्षा खूपच जास्त असते; त्यामुळे या खनिजांची रोजची गरज मसाल्यातून भागू शकते. ही द्रव्ये नैसर्गिक असल्यामुळे योग्य प्रमाणात शरीरात शोषली जातात.
या सर्व माहितीवरून अशा या ‘बहुरुपी बहुगुणी मसाल्यात दडलंय काय’ या प्रश्नाचे उत्तर मिळते. मसाले योग्य प्रमाणात नियमित खाणे प्रकृतीला हितकारक व आवश्यक असते.
आपल्या पूर्वजांनी विचारपूर्वक व सखोल प्रयोगांती मसाल्याचे निरनिराळे घटक रोजच्या आहारात अंतर्भूत केले आहेत. हा ज्ञानाचा अनमोल ठेवा आपणही पुढच्या पिढ्यांनी जतन केला पाहिजे. मसाले टिकवण्यासाठी किरणोत्सारी प्रक्रिया करतात. ६ ते १४ डॅ८ ची मात्रा देतात. त्यामुळे पोरकिडे व बुरशीपासून संरक्षण मिळते.
Leave a Reply