हिचे १ मीटर उंच हळदी सारखे दिसणारे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे कंद लांब कापरा सारखे वास असलेले असतात.पाने ३० सेंमी लांब व अनियमित रूंदीची व गुळगुळीत असतात.फुल मृदू रोमश व पांढरे असून ३० सेंमी लांबीच्या पुष्प ध्वजावर उगवते.फळ गोल व गुळगुळीत असते.
ह्याचा उपयुक्तांग कंद आहे.ह्याची चव तिखट,कडू,तुरट असून हि उष्ण गुणाची व हल्की व तीक्ष्ण असते.हि कफ व वातशामक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)सुज आली असता जसे कि सांधे सुजणे ह्यावर शटीचा लेप करतात.
२)मुखदुर्गंधी मध्ये शटीचा तुकडा चघळतात किंवा तिच्या चुर्णाने दांत घासतात.
३)शटी सर्दी खोकला ह्यात उपयुक्त आहे.
४)केस गळत असल्यास शटी तेलात घालून वापरतात.
५)त्वचा रोगात शटीचा उपयोग लेपासाठी करतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️ Dr Swati Anvekar
English Name:Spiked Ginger Lily