नवीन लेखन...

स्पोर्टस् टुरिझम

खेळ पर्यटन म्हटलं तर एकदम लक्षात येणार नाही, पण ‘स्पोट्र्स टूरिझम’ मात्र हमखास ध्यानात येईल अशी संज्ञा आहे. याची व्याख्या सोप्या भाषेत अशी करता येईल, विविध व्यक्तिगत/सांघिक स्पर्धात्मक वा मनोरंजनाच्या खेळांसाठी केलेले देशविदेशातील पर्यटन.

या पर्यटकांचे मुख्यत्वे दोन प्रकार म्हणजे- सहभागी होणारे खेळाडू व त्यांच्या सोबतचे सहाय्यक आणि दुसरे म्हणजे पहायला जाणारे प्रेक्षक.

जागतिक खेळ पर्यट

न संस्थेच्या मते गेल्या वीस वर्षात खेळांमधल्या प्रेक्षकांच्या स्वारस्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आणि आत्ता जवळजवळ ७६० कोटी डॉलर्स कोटींच्यावर असलेल्या आर्थिक उलाढालीत येत्या चार ते पाच वर्षात लक्षणीय वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. याची बरीच कारणे आहेत त्यापैकी काही प्रमुख कारणे म्हणजे –

  • पर्यटकांना उपलब्ध असणारी प्रवासाची वाहने व त्यावर मिळणाऱ्या विविध कंपन्याच्या सवलती.
  • दर चार वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या ऑलिंपिक, FIFA (वर्ल्डकप ), क्रिकेट विश्वचषक अशा स्पर्धात्मक खेळांसाठी उभारण्यात येणाऱ्या क्रीडानगरी, त्यातील निवासाची व्यवस्था, मूलभूत सुविधा, पर्यटकांसाठी आकर्षण असणारी प्रेक्षणीय स्थळे, शहरविकास तसेच अर्थव्यवस्थेला मिळणारी गती.
  • रेडिओ, दूरचित्रवाणी, लिखित माध्यमांबरोबरच इतर सामाजिक माध्यमांमधून देण्यात येणारी प्रसिद्धी व शेवटी…
  • खेळासाठी लागणाऱ्या साधनांमध्ये सातत्याने होणारी सुधारणा.

गेल्या काही वर्षांतले ऑलिम्पिक सामने ( ३ लाखांवर प्रेक्षक – २०१२ साली तर ५ लाखांवर – २०१६ साली) FIFA फेडरेशन इंटरनॅशनल ऑफ फुटबॉल असोसिएशन्स ३.४३ लाखांच्या वर २०१४ साली ब्राझिल येथे, तर ३.०३ लाखांच्या वर २०१८ साली रशियामध्ये प्रेक्षकांनी प्रत्यक्ष मैदानांवर उपस्थित राहून बघितले. आशियाई देशांचे सामनेदेखील (१.३ लाख प्रेक्षक) अशाच प्रमाणात बघितले जातात. प्रेक्षकांचा असाच अखंड उत्साह सामन्यांमधली चुरस वाढवत असतो.

युरोपीय देशांमधले UEFA ( युनायटेड युरोपिअन फुटबॉल असोसिएशन्स) संघटनेचे २१ – २४ देशांमधले सामनेही अशीच लाखो प्रेक्षकांची गर्दी खेचतात.

क्रिकेटची गोष्टच निराळी. जगभरात सर्वच देशांमधे खेळला न जाणारा खेळ असूनही त्याची जिथे खेळला जातो तिथली लोकप्रियता इतकी प्रंचड आहे की, जागतिक स्तरावरचे सामने उदा. विश्वचषक सामना हा इतका उत्साहात जोशपूर्ण वातावरणात, प्रेक्षकांच्या जल्लोषात खेळला जाणारा खेळ आहे की, अलीकडेच झालेला २०१९ सालचा विश्वचषक सामना आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढून सर्वात जास्त प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळला गेलेला सामना ठरला आहे. भारतीय पर्यटक या एका सामन्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. असाच एक Fourmula 1, Grand Prix हा खेळ. अत्यंत वेगवान मोटारींची एकेकट्या मोटारचालकांमधली ही चित्तथरारक स्पर्धा पहायलाही जगभरातील पर्यटक हजेरी लावतात. सर्वांत कमी स्पर्धकांची ही स्पर्धा प्रचंड प्रतिसादात (३ लाखावर प्रेक्षक) संपन्न होते, पण ही मोटारचलित वाहनांची स्पर्धा असल्याने इंटरनल ऑलिंपिक कमिटीची याला खेळ म्हणून मान्यता नाही.

आणखी एक असाच खेळ ज्यासाठी प्रेक्षक वर्षभरात आवर्जून हजेरी लावतात.. तो म्हणजे टेनिस… ह्यातल्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांना.. फ्रेंच ओपन टूर्नामेंट, अमेरिकन ओपन टूर्नामेंट, ऑस्ट्रेलियन ओपन टूर्नामेंट आणि सर्वात मानाची म्हणून ओळखली जाणारी विम्बल्डन टेनिस टूर्नामेंट… ह्या ही प्रत्येक स्पर्धसाठी त्यातील होणाऱ्या सर्व सामन्यांना मिळून, पर्यटक लाखाहून अधिक संख्येने उपस्थित राहून खेळातील उत्कंठा कायम ठेवतात.

भारतीय पर्यटक सर्वात जास्त हजेरी लावतात ती क्रिकेटसाठी! याशिवाय ऑलिम्पिक, आशियाई, क्रीडास्पर्धा वगैरे. साहसी मनोरंजनाच्या खेळासाठी मात्र बरेचजण पर्यटन करताना दिसतात.

संपूर्ण जगभरात साहसी खेळांसाठी पुष्कळ ठिकाणे लोकप्रिय आहेत, आता भारतातही अशी पर्यटनस्थळे विकसित करण्यात आली आहेत. जगभरातील पर्यटक आपल्या बकेटलिस्टप्रमाणे आपली साहसाची आवड पूर्ण करायला देशोदेशी भ्रमंती करत असतात. आता आपला देशही यातील एक आकर्षण आहे, हे साहसीवीर भूभाग, जल तसेच आकाश ह्या तिन्हींमध्ये खडतर प्रवास वा मुक्त स्वैर विहार असो, त्यातील अद्भूत व चित्तथरारक अनुभव घेत असतात.

भूभागावरील पदभ्रमण, गिर्यारोहण, सायकलींग, माउंटन बाईकिंग, व्हॅलीक्रॉसिंग इ. सारखी खेळ विशेषतः तरुणाईमध्ये खूपच लोकप्रिय झाले आहेत. त्यातही नवीन खेळ म्हणजे ओरींएंटीअरींग म्हणजे ठरलेल्या प्रदेशात नकाशानुसार घेण्याचा स्थळशोध

 

क्रीडा प्रकार

प्रस्तरारोहण

हिमरोहण

माउंटन बाईकिंग

व्हॅली क्रासिंग पॅरा सेलिंग

सर्फंग

राफ्टींग, कायकिंग स्कुबा डायव्हिंग स्नॉर्फेलिंग

बंजी जंपिंग

हेली स्काय डायव्हिंग पॅराग्लाइडिंग

फ्लाइंग फॉक्स

जायंट स्विंग

 

जागितक क्षेत्र

अल्प्स् शिखरे

अमेरिका

कॅनडा

अमेरिका, कॅनडा

बहामाज, फ्लोरिडा, फिलीपाइन्स

युके, इजिप्त, हवाई बेटे

कॅनडा, मेक्सिको, व्हँकूव्हर

रेड सी, इजिप्त, ऑस्ट्रेलिया

थायलंड, बाली

मकाऊ, झांबिया

ऑस्ट्रेलिया, अल्प्स्, फ्लोरिडा

अमेरिका, फिलीपाइन्स

ऑस्ट्रेलिया

बँकॉक (थायलंड)

 

भारतातील पर्यटन क्षेत्र

सह्याद्री पर्वतरांगा

हिमालय

लडाख, सिक्कीम ट्रेक्स रत्नागिरी माथेरान

रत्नागिरी, तारकर्ली

अंदमान, लक्षव्दीप,

नेत्रणी (कर्नाटक)

हृषिकेश, लोणावळा

गुलमर्ग, मनाली

बीर (हिमाचल) लडाख,

गोवा, पाचगणी (महाराष्ट्र)

हृषिकेश

ऋषिकेश, संधान व्हॅली

(अहमदनगर – महाराष्ट्र)

निसर्गाच्या सानिध्यात वनराई, दाट झाडी, जंगले वा उंचसखल प्रदेश यातून नकाशातील खाणाखुणा शोधत ठराविक ठिकाणे शोधण्यासाठी केलेले पदभ्रमण असे याचे स्वरूप आहे.

नौकानयन, पॅरासेलिंग, सर्फंग वॉटर बोर्डींग (पतंग) काईट सर्फंग, कयाकिंग हे पाण्याच्या पृष्ठभागावरचे साहसी जलक्रीडाप्रकार ज्यात जिद्दीने निसर्गाशी झुंज देण्याची प्रवृत्तीच पणाला लागते तसेच स्कुबा ड्रायव्हिंग, स्नॉर्केलिंग, पाण्याखालचे पदभ्रमण (अंडरवॉटर वॉक) यामधे जलविश्वातील आश्चर्यकारक रंगीबेरंगी दुनियेची सफर करता येते. कोरल्स तसेच चित्रविचित्र अगणित जलचर समुद्र शांत असेल तर पर्यटकांना आनंद देऊन जातात.

आकाशातील साहसी खेळ म्हणजे तर प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्यांना जितके थरारक तितकेच बघणाऱ्यालाही. यामध्ये बंजीजंपिंग, हेली स्काय डायव्हिंग, पॅराग्लाइडिंग, फ्लाइंग फॉक्स, जायंट स्विंग या क्रीडाप्रकारांचा समावेश होतो. उष्ण हवेच्या प्रचंड फुग्यांमधूनही आकाशभ्रमणाचा अनुभव घेता येतो.

या सर्व खेळांमध्ये युवावर्ग मोठया हिरीरीने भाग घेताना दिसतो. मनुष्य विरुद्ध निसर्ग असंच ह्या खेळाच स्वरूप असल्याने, धाडसी वृत्ती, झुंजार, जिद्द, मेहनत घेऊन लक्ष्य गाठण्याची प्रवृत्ती, खेळाडूच्या शारीरिक व मानसिक क्षमतांची कसोटीच असते. वेळोवेळी निसर्गाची साथ नसेल तर त्याच्या रौद्र अथवा चंचल रूपाशी टक्कर देण्यापेक्षा कधीकधी माघार घेणेच श्रेयस्कर ठरते शेवटी साहस करतानाही सुरक्षितता महत्त्वाची.

-रजनी नितीन कोठारे

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..