चित्र काढण्यासाठी कागद, पेन्सिल व रंग हि लागतात. आधीच सौ.ला माझ्या डोक्याविषयी जबरदस्त शंका आहे. त्यात या वयात चित्रकलेसाठी लागणारे साहित्य विकत घेतले असते तर ‘नवऱ्याला नक्कीच वेड लागले आहे‘, याबाबत तिची शंभर टक्के खात्री झाली असती. चित्रकलेचे साहित्य विकत घेण्याचा विचार मनातून काढून टाकला. इरादा पक्का असेल तर रस्ता हि सापडतोच. टेक्नोलॉजीची मदत घेण्याचे ठरविले. आता पुढचा प्रश्न – चित्र कोणते काढायचे. माझी एक घाण सवय आहे, काही करण्याच्या आधी मी त्या विषयाच्या मुळात शिरतो. विचार केला, जगातील पहिले चित्र कोणते. बहुतेक सृष्टीच्या प्रारंभिक क्षणाचे चित्र अर्थात बिग बँगचे चित्र असावे. पुन्हा विचार केला, जे माहित आहे, त्याचे चित्र कुणीही काढू शकतो. त्यात विशेष काय. ज्याच्या बाबतीत काहीच माहित नाही त्या सृष्टीकर्त्याचे चित्र काढले पाहिजे. त्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी जगातील सर्वात जुना ग्रंथ अर्थात ऋग्वेद पडताळला. ऋषी नेती नेती म्हणतात, ते काय:
|