१९२६ साला पासून या जोडीनी खरी धमाल सुरू केली. त्यांचा जन्म १६ जुन १८९० रोजी झाला. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक तुडूंब प्रसन्न होते. सा-या जगभर या जाड्या-रड्याचा धुमाकूळ चालू होता. जगातल्या सुमारे वीस भाषांमध्ये हे लघु-चित्रपट अनुवादित झाले आणि पुन:पुन्हा पाहिले गेले. स्टॅन लॉरेल आणि ऑलिव्हर हार्डी या जोडीनं हॉलिवूडमध्ये तब्बल १०७ चित्रपट केले. ही संख्या त्यांच्या एकत्र असलेल्या चित्रपटांची आहे. यात एकूण ३२ मूक-लघुपट, ४० लघुपट आणि २३ पूर्ण लांबीचे चित्रपट आहेत. शिवाय १२ चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुण्या कलाकारांची भूमिका केली होती. त्यापूर्वी म्हणजे त्यांची जोडी होण्यापूर्वीच लॉरेलनं ५० आणि हार्डीनं तर चक्क २५० चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या.
१९२१ मध्ये ‘द लकी डॉग’ हा त्यांचा एकत्र असा चित्रपट आला होता, पण तो ‘लॉरेल-हार्डी’ जोडीचा चित्रपट म्हणून ओळखला जात नाही. तेव्हाच त्यांची जोडी करायला हवी होती, पण त्यांना नंतर एकत्र आणलं हाल रोच या निर्मात्यानं. हे साल होतं १९२६. ‘लॉरेल-हार्डी’ आणि ‘अवर गँग’ या हाल रोच यानं जगाला बहाल केलेल्या दोन लघुपट मालिका आहेत. पैकी लॉरेल हार्डीचं यश प्रचंड मोठं होतं. पुटींग पँट्स ऑन फिलिप’ हा लॉरेल-हार्डीचा एकत्र असा पहिला लघुपट आला १९२७ मध्ये. हा मूकपट होता.
१९४० पर्यंत ते ‘हाल रोच स्टुडिओज्’ बरोबर होते. त्यानंतर पाच वर्षं त्यांनी ‘ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स’ आणि ‘एमजीएम’ बरोबर एकूण आठ चित्रपट केलेत. आपला शेवटचा चित्रपट ‘अॅ टॉल के’ केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून रीतसर निवृत्ती घेतली. ‘द म्युझिक बॉक्स’ हा त्यांचा सगळ्यात गाजलेला चित्रपट, ‘द म्युझिक बॉक्स’ या चित्रपटाला पहिलं ऑस्कर मिळालं होतं आणि १९६० मध्ये स्टॅन लॉरेल यांना अॅ केडेमीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. स्टॅन लॉरेल यांचे २३ फेब्रुवारी १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ प्रसाद नामजोशी
लॉरेल हार्डी चे चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=YLXjxu1VWZ4
https://www.youtube.com/watch?v=ftYjyEi7dpQ
https://www.youtube.com/watch?v=YzqPoeuGwsE
https://www.youtube.com/watch?v=zTAPZTfIXVE
Leave a Reply