साहित्य –
बोनलेस चिकन – आर्धा किलो
आलं लसुण पेस्ट – 2 चमचे
बेसन पीठ – 1/2 वाटी
ब्रेड चा चुरा – 8 ब्रेड चे तुकडे
लाल तिखट – 2 चमचे
गरम मसाला – 1 चमचा
लिंबाचा रस -3 चमचे
चाट मसाला – चिमुट भर
चवी पुरते मीठ
तऴण्यासाठी तेल.
कृती –
प्रथम चिकन चे छोटे तुकडे करुन घ्या. स्वछ्च धुवुन घ्यावे. नंतर आलं लसुन ची पेस्ट ,मीठ,लाल तिखट ,गरम मसाला ,लिंबाचा रस आणि चाट मसाला एकत्र करुन ते चिकनला अर्धा तास भर लावुन ठेवावे..
नंतर एका बाउल मध्ये बेसन चे भजी साठी जसे मिश्रण बनवले जाते. तसेच मिश्रण करावे त्या मिश्रणात थोडेसे मीठ व लाल तिखट घालावं जेणे करुन चिकन वरील आवरणासं चव य़ेईल.
आता एका थाळीत ब्रेडचा चुरा करुन (ब्रेड क्रम्स) पसरवावा. मग एक एक करुन चिकन चे तुकडे प्रथम बेसनच्या मिश्रणात घोळवुन नंतर ब्रेडच्या चु-यात घोळवुन मंद आचेवर लालसर होईपर्यंत तळुन घ्यावेत…
गरमा गरम चिकन पकोडे सेजवान चटणी किंवा सॉस सोबत सर्व्ह करावेत….
Leave a Reply