नवीन लेखन...

थोडे अमेरिकेविषयी

 

आजकाल आपल्यापैकी अनेकजण अमेरिकेत येत जात असतात. अमेरिकेविषयी त्यांना माहितीही असते. त्या माहितीत मी ही थोडी भर घालीत आहे. मुळात अमेरिका ही अन्य देशांतील लोकांना सर्वस्वी अपरिचित होती.. भारताच्या शोधात कोलंबस निघाला आणि तो अमेरिकेच्या किनाऱ्याला लागला.

अमेरिका हा विशाल भूप्रदेश आणि तिथले स्थानिक लोक पुढे रेड इंडियन्स म्हणून ओळखले गेले. कालांतराने युरोपातील वेगवेगळ्या देशांतील प्रवासी इथे आले. त्यांनी आपल्या वसाहती वसवल्या. त्या पूर्वी त्यांना स्थानिक रेड इंडिअन्स लोकांशी संघर्ष करावा लागला. अनेकदा युध्दंही झाली. इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्पेन, कोरिया, चीन या देशांतील हे लोक होते.

त्यामुळे सुरुवातीच्या काळापासून इथे अनेक भाषिक लोकांच्या वसाहती निर्माण झाल्या. त्यांनी स्मरण म्हणून आपल्या परगण्यांची नावे दिली. जे जर्सी स्टेट मधून आले त्यांनी न्यूजर्सी नाव दिले, जे हॅमशायरहून आले त्यांनी न्यूहॅमशायर असे नाव दिले. अशारीतीने अमेरिकेत गावांना, शहरांना नावं मिळाली. त्याचबरोबर अनेक ख्रिश्चन धर्मोपदेशक आले. त्यांच्या नावाने शहरांची, रस्त्यांची नावे दिली गेली.

अमेरिकेचे पहिले अध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंगटन यांची निवड झाली. ते १७८९ ते १७९७ असे सलग आठ वर्षं अध्यक्ष होते. त्यानंतर ४४ अध्यक्ष झाले. ट्रम्प हे ४६ वे अध्यक्ष आहेत. यापैकी १६ जणांना दोन टर्म्स मिळाल्या.

अब्राहम लिंकन हे प्रथम अध्यक्ष झाले तेव्हा सिव्हीलवॉर जोरात होते. ते त्यांनी मिटवले तोच दुसऱ्या टर्मच्या निवडणुकीला उभे राहिले. मॉक्लीन हे त्यांच्या विरोधात उभे होते आणि लिंकन हरतील अशी हवा होती. त्याचवेळी शिव्हालचे युध्द सुरू झाले होते आणि लिंकनविरोधी वातावरण तापले होते. परंतु नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा निकाल आला आणि लिंकन निवडून आले. अधिकारपदाची शपथ घेण्याआधीच लिंकन यांची हत्या झाली.

त्यानंतर ऑड्यू जॉनसन अध्यक्ष झाले. १७६१ साली जॉन एफ्. केनेडी अध्यक्ष झाले. परंतु त्यांचीही हत्त्या १९६३ साली झाली.

पहिल्या महायुध्दाच्या काळात (१९१४-१९१९ काळात) बुड्रो विल्सन हे, तर दुसऱ्या महायुध्दाच्या काळात फ्रँकलीन रुझवेल्ट हे अध्यक्ष होते. गेल्या जवळजवळ ३०० वर्षांच्या काळात स्वातंत्र्ययुध्द (१७७५-१७८२), ब्रिटनविरोधात युध्द (१८१२), गुलामगिरीविरोधात उठाव (१८३१), मेक्सिकोविरुद्ध युध्द (१८४६-१८४८), सिव्हील वॉर (१८६१-१८६५), स्पॅनीश-अमेरिका युध्द (१८९८), पहिले जागतिक महायुध्द (१९१४-१९१९), पर्ल हारबरवर हल्ला (१९४१), कोरियनयुध्द (१९५०-१९५३), दुसरे महायुध्द (१९३९-१९४५), क्यूबन क्रांती (१९५९/१९६२), व्हिएतनाम युध्द (१९५९-१९७५), वॉटरगेट (१९७४), इराणी होस्टज संघर्ष (१९७९-१९८१), गल्फ युध्द (१९९०-१९९१) आणि इराकयुध्द (२००३) या सारखी युध्दं झाली.

म्हणजे अमेरिकेत सारे आलबेल होते असे मात्र नाही. वॉर ऑफ इंडिपेन्डन्स (१७७५-१७८२), स्वातंत्र्याचा जाहीरनामा (१७७६), शिकागो जागतिक अधिवेशन (१८९३), वर्तमानपत्रांचा विकास (१८९७), विमानांचा शोध (१९०१), सनफ्रॅन्सिस्को भूकंप (१९०६), मोटारींचा शोध (१९०९), मूकपटाचा प्रारंभ (१९१०), चार्ल्स लिंडबर्गचे विमानोड्डाण (१९२९), वालस्ट्रीट कोसळणे (१९२९), हॉलीवूड (१९३०), ऑटमबाँबचा शोध (१९४१-१९४५), टेलिव्हिजन (१९५०), अवकाशशोध (स्पूटनिक) (१९५७), बर्लिन भिंत (१९६१), इंटरनेटचा शोध (१९९८) अशा महत्त्वपूर्ण घटना घडल्या.

अमेरिकेसंबंधी हे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

-– डॉ. अनंत देशमुख 

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून) 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..