भाग ५
आज जगाची नजर आशियाकडे लागलेली आहे, भारताकडे लागलेली आहे. ह्यात कसलीही अतिशयोक्ति नाहीं, तर तें सत्य आहे. भारतीयांच्या योग्यतेची आम्हाला नसली तरी पाश्चिमात्त्यांना कल्पना आहे. ‘How Race, Religion & Identity Determines Success in the New Global Economy’ या नावाचं एक पुस्तक जोएल कॉटकिन या गृहस्थानं लिहिलं आहे व तें न्यू यॉर्कहून १९९२ साली प्रसिद्ध झालें आहे. त्यावर आधारित लेख, ‘World Executive Digest’ ह्या हाँगकाँगहून प्रसिद्ध होणार्या मासिकाच्या डिसेंबर १९९३च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.
हे सर्व सविस्तर सांगायचं कारण असं की भारतीयांविषयी हें जें लिहिलं आहे, तें कुणी भारतीयाने नव्हे आणि लिहिलं गेलं आहे ते हल्लीहल्लीच, कधी पुराणकाळी नव्हे.
हा जोएन कॉटकिन ‘Global Tribes’, म्हणजे जगभर फैलावलेल्या एकवंशीय समूहांबद्दल लिहितो आहे. त्यात त्यानें फक्त पाच समूहांनाच जागतिक म्हणून संबांधलं आहे. ते पाच असे.
१) ब्रिटिश व अमेरिकन
२) ज्यू
३) चिनी
४) जपानी
५) भारतीय
त्याच्या लिखाणाचं मराठी भाषांतर करण्याचं टाळून मी मुद्दामच त्यातील संबंधित भाग मूळ इंग्रजीत दिलेला आहे, कारण त्याच्या आशयात मी तिळमात्रही बदल करुं इच्छित नाहीं.
= अवतरण सुरूं =
Global Tribes . . . will increasingly shape the economic destiny of mankind.
पुढे तो भारतीयांविषयी लिहितो, ‘‘. . . further in the future lives the possible emergence of yet another great Asian tribe, the Indians . The Indians boast a long historical memory and a well-developed cultural sense of uniqueness . . . they have in recent decades developed their own increasingly potent global diaspora from North America and Britain to Africa and South East Asia. The more than 20 million overseas Indians today represent one of the best educated, affluent groupings in the world. They boast one of the world’s deepest reservoirs of scientific and technical talent . . . they (Indians) may prove to be the next diaspora to emerge as a great economic force.’’
= अवतरण समाप्त =
तेव्हां आपण स्वतःवर, आपल्या संस्कृतीवर आणि पर्यायानें आपल्या मातृभाषेवर विश्वास ठेवूं या. आपण अभिमानानं म्हणूं या आणि कृतीनेंही दाखवून देऊं या, की –
हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडूं
वसे आमुच्या मात्र हृद्मंदिरी
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे
हिला बसवू वैभवाच्या शिरीं ।।
(समाप्त )
— सुभाष स. नाईक
Leave a Reply