नवीन लेखन...

स्टेल्थ हेलिकॉप्टर

स्टेल्थ याचा अर्थ एखादे साधन शत्रूला दिसू न देता त्याच्या मदतीने गुप्तपणे कारवाई घडवून आणणे. अमेरिकेने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अल काईदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला ठार करतानाच्या कारवाईत स्टेल्थ हेलिकॉप्टर वापरले होते. पाकिस्तानचा मित्र असलेल्या चीनने लगेच त्यातील एका पडलेल्या हेलिकॉप्टरच्या अवशेषांची छायाचित्रे मागितली होती.

स्टेल्थचे नेमके कुठले तंत्रज्ञान अमेरिकेकडे आहे हे त्यांना पाहायचे असावे. पाकिस्तानने एकदा असेच अमेरिकेने तालिबानवर लादलेले टॉमहॉक क्षेपणास्त्र चीनच्या हवाली केले होते. त्यावरूनही चीनने बरीच तांत्रिक माहिती मिळवली. स्टेल्थ हेलिकॉप्टरचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे ते शत्रूच्या रडारला चकवा देते.

त्याचा आवाजही फारसा येत नाही. तज्ज्ञांच्या मते ते एमएच ६० ब्लॅक हॉक प्रकारचे हेलिकॉप्टर होते. त्याच्यात आणि एफ-११७ स्टील्थ फायटरमध्ये बरेच साम्य असते. नेहमीच्या हेलिकॉप्टरपेक्षा या हेलिकॉप्टरचे वजन ५०० ते १००० पौंडांनी अधिक असते. स्टेल्थ हेलिकॉप्टर प्रणाली तशी नवीन नाही. आरएएच ६६ कोमान्चे या हेलिकॉप्टरमध्ये हे तंत्रज्ञान वापरले होते.

या तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे यात हेलिकॉप्टरचा आवाज कमी केला जातो. मुख्य व शेपटीकडे जास्त पाती वापरल्याने तो कमी होतो. हेलिकॉप्टरमध्ये आवाज हा इंजिन मेन रोटर ब्लेड व मेन रोटर ब्लेडचा असतो. आवाज कमी करताना इंजिन वरच्या बाजूला ठेवून तो आकाशात सोडण्यासाठी प्लेट्स लावल्या जातात. रडारला चकवा देण्यासाठी ते समोरून व बाजूने लहान दिसेल अशी व्यवस्था केली जाते. त्यात तिरक्या पृष्ठभागांचा वापर केला जातो.

इंजिन आतल्या किंवा वरच्या बाजूला बसवले जाते. पाती व त्याचा इतर भाग यांच्यात सरमिसळ केली जाते. रडारकडून येणाऱ्या लहरी शोषून घेतील असा रंग या हेलिकॉप्टरला असतो. धुरामुळे हेलिकॉप्टर क्षेपणास्त्राच्या टण्यात येऊ शकते, त्यामुळे यातील इंधनाचा धूर फार कमी कोनातून पसरेल असे बघितले जाते.

हेलिकॉप्टर किंवा विमानातही इलेक्ट्रॉनिक यंत्रणा असतात. त्यांच्यातून निघणाऱ्या संदेशांची कंपनसंख्या कमी करावी लागते. अँटेनाच्या तारांची संख्या कमी करावी लागते. एरवी रेडिओ लहरी हेलिकॉप्टरवर आदळून परत येतात व ते सहजपणे रडारला कळते. तसे स्टेल्थ हेलिकॉप्टरच्या बाबतीत होत नाही. ते शत्रूच्या रडारला सापडत नाही. अगदी खाली येऊन निरीक्षण करू शकते.

जर विमान किंवा हेलिकॉप्टरला वळणदार आकार असतील तर रेडिओ लहरी आपटून त्या रडारकडे जातात व ते दिसते, पण त्यांचा पृष्ठभाग सपाट असेल तर आपटलेल्या रेडिओ लहरी परत रडारकडे न जाता काही प्रमाणात अवकाशात विखुरल्या जातात. परिणामी रडारवर काही दिसत नाही. बी-२ स्टेल्थ बॉम्बरला एक विशिष्ट कोटिंग केलेले असते. त्यामुळे रेडिओ लहरींना ते दाद देत नाही, पण हे कोटिंग पावसात टिकत नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..