पेला म्हटल कि आपल्या समोर कोणत चित्र उभ रहात!
आम्ही म्हणजे आमच्या घराण्यात या चित्रात दिलेल्या आकाराचा पेला गेली आठ दहा दशके तरी वापरत आहोत. पुर्वी पितळिचे होत. मग जर्मन सिल्वर व १९७०-८०पासून स्टीलचे. आता या आकाराचे पेले उत्पादन होत नसावे. आमच्या कडे या आकाराचे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पेले रोजच्या वापरात आहेत. काही जाडजूड वजनी, काही पातळ, काही शंभर एम एल द्रव्य मावेल असे तर काहीत २०० एम एल.
पेला म्हटल कि पंजाबचा लांबट निमुळता अर्धा लिटर छाक प्यायचा आठवत असेल.
काहीकडे छोटे लाबट निमुळताच पेला वापरतात. असच ताट-ताटली, वाटी-वाडग, टोप चमचा, बशी या बद्दलही असेल. आपल्या वापरातील वस्तूच चित्रच डोळ्यासमोर उभ रहात ना!
आता प्लास्टिक, आलूमिनियचीही उत्पादने प्रचलीत आहेत.
स्टिलचा ग्लास म्हणजे उभा पेला. चहाचा ग्लास व कोल्ड्रिंक्स पिण्याचा ग्लास काही ठराविकच चित्र समोर येत ना!
– श्रीकांत बर्वे
युगाब्द ५१२३
युगाब्द ५१२३
Leave a Reply