पोलादसम्राट लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल यांचा जन्म १५ जून १९५० रोजी सादुलपूर, राजस्थान येथे झाला.
लक्ष्मी मित्तल हे ब्रिटन मधील सर्वात श्रीमंत भारतीय समजले जातात. लक्ष्मी मित्तल यांचे शालेय शिक्षण कोलकाताच्या श्री दौलतराम नोपानी स्कूल मध्ये झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण कोलकाताच्या सेंट झेवियर्स कॉलेज मध्ये झाले. तेथे त्यांनी बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले. सुरुवातीच्या काळात लक्ष्मी मित्तलांच्या वडिलांची भागीदारी असलेल्या ‘ब्रिटिश इंडिया रोलिंग मिल्स’ या लोखंडाच्या रसापासून पट्ट्या, कांबी व सळ्या तयार करण्याच्या कारखान्यात लक्ष्मी मित्तल सुट्टीच्या वेळी काम करत असत. त्या काळी लोखंडाच्या कारखान्यासाठी परवाने मिळवणे अवघड असल्याने लक्ष्मी मित्तलांच्या वडील आणि चुलत्यांनी मिळून जुने डबघाईला आलेले कारखाने सुरुवातीला ताब्यात घेण्याचे धोरण राबवले. १९६३ साली मित्तलांच्या वडिलांना आंध्र प्रदेशात लोखंडाचे उत्पादन करणारा कारखाना काढण्याचा परवाना मिळाला. त्या कारखान्याला त्यांनी ‘मित्तल इस्पात’ असे नाव दिले. मित्तल कुटुंबाचा तो पहिला उत्पादन प्रकल्प ठरला. इंडोनेशियातील पूर्व जावा बेटात लोखंडाचे उत्पादन करण्याचा कारखाना काढण्याची तेथील सरकारची निविदा बघून मित्तलांच्या वडिलांनी तेथे जाऊन जागा विकत घेतली. परंतु पुढे तेथील शासनाने जाचक अटी लादल्या व वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. वीज पुरवठ्याची व्यवस्था करायलाही तिथले सरकार तयार नव्हते. या सर्व कारणांमुळे लोखंडाचा कारखाना उभारण्यासाठी घेतलेली जमीन विकण्याचा निर्णय मित्तलांच्या वडिलांनी घेतला व ही घेतलेली जमीन विकून टाकण्यासाठी त्यांनी लक्ष्मीनिवास मित्तल यांना जावाला पाठविले. मित्तल बंधूंमध्ये १९९४ साली संपत्तीची वाटणी झाल्यानंतर दोन वेगळे उद्योग समूह अस्तित्वात आले होते. त्यानंतर लक्ष्मी मित्तल यांनी २००६ ‘आर्सेलर मित्तल’ची स्थापना केली. सध्या लक्ष्मी मित्तल ‘आर्सेलर मित्तल’चे सीईओ व चेयरमेन काम बघत आहेत. २००७ मध्ये भारत सरकारने लक्ष्मी मित्तल यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच २००८ मध्ये लक्ष्मी मित्तल यांना फोर्ब्ज मासिकाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. २०१३ मध्ये लक्ष्मी मित्तल यांना ‘चेंजिंग द फेस ऑफ ब्रिटन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लक्ष्मी मित्तल यांच्याकडे इंग्लिश फुटबॉल क्लब ‘क्वींस पार्क रेंजर्स’ची ३३ % मालकी आहे.
अमेरिकेतील ‘केल्लोग्स स्कूल ऑफ मैनेजमेंट’ च्या सल्लागार बोर्डवर व ‘क्लीवलैंड क्लिनिक’ च्या ‘बोर्ड ऑफ ट्रस्टीज’ चे सदस्य लक्ष्मी मित्तल राहिले आहेत.२००३ मध्ये लक्ष्मी मित्तल व त्यांच्या ऊषा मित्तल फाउंडेशनने राजस्थान सरकार बरोबर जयपुर मध्ये ‘एल.एन.एम. इंस्टीट्यूट ऑफ इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी’ ची स्थापना केली आहे.
लक्ष्मी मित्तल यांच्या पत्नीचे नाव उषा मित्तल आहे. उषा मित्तल या फारच हुशार असल्याचे बोलले जाते. आपल्या पतीच्या व्यवसायात त्यांना त्या नेहमी मदत करत असतात. उषा मित्तल यांनी शिक्षण क्षेत्रात खूप चांगले काम उभे केले आहे. त्यांचे चिरंजीव हे त्यांच्या बरोबरच आदित्य मित्तल या व्यवसायात आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply