कैरी पिकून आंबे मिळावेत यासाठी आपण खास पेंढ्याची आढी घालतो. द्राक्षे, संत्रे यासारखी फळं आपण फ्रीजमध्ये ठेवतो. काही फळं मुद्दाम पिशवीत ठेवतो, तर केळ्यासारखी फळं बाहेर ठेवतो. सरक सगळ्या फळांना आपण एकाच पद्धतीने का ठेवत नाही? थोडक्यात आणलेलं फळं जास्त दिवस चांगल्या स्थितीत राहावं यासाठी आपण ते फळ कोणत्या प्रकारचं आहे, हे विचारात घेतो.
काही फळं कच्ची असतानाच इथिलिनमुळं उद्दिपित झालेली असतात. अशी फळं पिकायला थोडा अवधी असताना आधीच झाडावरून काढली तरी त्यांच्यात पिकण्याची क्रिया तशीच आंबा, पुढे चालू राहते. उदाहरणार्थ, सफरचंद, पेरू, केळी, चिकू, बोरं ही फळं झाडवरून काढल्यानंतरही पिकतात. अशी फळं विकत घेतानाच आपण काळजी घ्यायला हवी.
चीर गेली आहे किंवा कापली गेली आहेत, अशी फळं घेऊ नयेत. अशा फळांतून इथिलिन जास्त प्रमाणात बाहेर टाकलं जातं आणि त्यामुळे फळं पिकण्याची प्रक्रिया वेगात होते.
आढीत एक जरी नासका आंबा असेल तर त्यामुळे बाकीचे आंबे नासतात, हे आपल्याला माहीत आहेच. किडीमुळे वा अन्य कारणांमुळे आंब्यावर व्रण पडतो.
इथिलिन बाहेर पडल्यामुळे बाकीचे आंबेही वेळेआधी जास्त पिकतात, नासतात.
पिकलेल्या फळांतून जास्त इथिलिन बाहेर टाकलं जातं. याच गोष्टीचा उपयोग कच्ची फळं पिकवण्यासाठी होऊ शकतो. कच्च्या फळांत एक पिकलेलं फळ ठेवलं तर ती फळे लवकर पिकतील. बराच काळ पिशवीत ठेवल्यानेही फळं लवकर पिकतात.
ते टाळण्यासाठी फळं शक्यतो जाळीदार वा भोके असलेल्या पिशवीत ठेवावीत. पण सर्वच कच्ची फळं इथिलिनमुळं उद्दिपित होऊन पिकतात असं नाही.
संत्रे, का मोसंब, लिची, द्राक्षे यासारखी फळं झाडावरून तयारच काढावी लागतात. अशी फळं फ्रीजमध्ये जास्त काळ चांगली राहू शकतात.
थोडक्यात फळ कोणत्या प्रकारचं आहे, यावरून ते कुठं आणि कसं ठेवायचं हे ठरवावं.
चारुशीला जुईकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply