नवीन लेखन...

फळे व भाजीपाला : साठवण

फळे कमी तापमानाला आणि योग्य आर्द्रतेला साठवल्यास फळांमधील जैवरासायनिक क्रियांचा वेग मंदावतो फळांचे आयुष्य वाढते. कमी तापमानाच्या फळांच्या साठवणीला शीतगृहातील साठवण“(कोल्ड स्टोरेज ) म्हणतात.

बाष्पीभवनाने थंडपणा या तत्त्वावर आधारित कमी खर्चाचा आणि कमी ऊर्जेचा शीतकक्ष (कूल चेंबर ) फळांच्या साठवणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यालाच शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष म्हणतात. स्वस्त आणि सहज उपलब्ध असणार्‍या विटा, बांबू वाळा आणि गोणपाट इत्यादी वस्तूंपासून तो बनवता येतो. शीतकक्षामध्ये बाहेरील वातावरणाच्या तुलनेत तापमान कमी व आर्द्रता जास्त असल्याने फळांमध्ये बाष्पीभवन कमी होऊन त्यांच्या वजनात घट येत नाही. फळांच्या श्वसनक्रियेचा वेग मंदाचतो. फळातील उष्णतामान कमी होण्यास मदत होते. त्यामुळे फळे हळूहळू परंतु एकसमान पिकू लागतात. फळे व भाजीपाला ताजा, टवटवीत व आकर्षक राहतो. फळांपासून प्रक्रिया केलेले विविध पदार्थ, दूधव अंडीसुध्दा शीतकक्षात उत्तम प्रकारे साठवता येतो. शेतकरी शीतकक्ष आपल्या शेतावर स्वत:बांधू शकतो.
नियंत्रित वातावरणातील साठवण पध्दतीमध्ते कक्षातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करुन कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढवतात. त्यामळे फळांच्या श्वसनाचा वेग मंदावतो ती हळूहळू पिकतात व सुकत नाहीत. फळांची बुरशी व जीवाणूंमुळे होणारी नासाडी टाळली जाते व त्यांच्या वजनात येणारी घट कमी होते.
परिवर्तित वातावरणात साठवण पद्धतीत ऑक्सीजनचे प्रमाण कमी करुन कार्बनडायऑक्साईड व नायट्रोजनचे प्रमाण वाढवून फळे पॉलिथीनच्या पिशवीत हवाबंद करतात. पिशवीत हवा पाणी शोषून घेणारे पदार्थ ठेवतात. टोमॅटो,भेंडी काकडी, अळंबी यांच्यासाठी हे फायदेशीर आहे.
कमी दाबाच्या वातावरणात साठवण केल्यामुळे फळांना ऑक्सिजन कमी मिळतो. त्याची श्वसनक्रिया मंदावते. फळांतील इथिलीन वायूचे उत्पादन कमी होऊन फळे पक्क होण्याची क्रिया मंदावते. फळांचे आयुष्यमान वाढते.
गॅमा किरणांच्या प्रक्रियेमुळे फळे पिकण्याची क्रिया संथ होते. किडींचा आणि रोगजंतूचा नाश होतो. कंदमुळे, बटाटा, रताळी, कांदे, आले, लसूण इत्यादींमध्ये कोंब फुटणे टळते. यालाच कोल्ड स्टेरिलायझेशन म्हणतात.

— डॉ. विष्णू गरंडे
(मराठी विज्ञान परिषद, मुंबई)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..