लाजेची मशाल नयनी,
नाकात नाजूक नथनी,
लाल ओठ गुलाबी छान,
स्त्री तू सौंदर्यांची खाण…
झुपकेदार शेपूट कुंतलेचं,
मुक्त कमरेवरी रुळलेलं,
शान तूझ्या मोहक स्त्रित्वाची,
गुंफुनी गजऱ्यामध्ये माळलेलं…
उडे ऐटीत डौल पदराचा,
कुंपण घाली मंद वारा,
झाकाळलेल्या या रुपासमोरी,
फिक्या त्या लखलखणाऱ्या तारा…
कामिनी गं तु योवणाची,
वसुंधरेची अभिमानास्पद मान,
अंकुश घाली स्त्रिशक्तिवर,
हे शृंगारिक देह वरदान…
– श्वेता संकपाळ