कधी क्वचित मी खचून जाता
उंच भरारी घेते मी
टपकलेच जर अवचित अश्रू
नकळत त्यांना पुसते मी
थोपटते मी माझे मजला
गोंजारते मलाच मी
ऊर्मी माझ्या अंतरातल्या
नजाकतीने जपते मी
दुखता खुपता होता अगतिक
दु:ख झुगारुन देते मी
नव्या दमाने श्वास घेउनी
पुढे पुढे हो जाते मी
मीच असते तेव्हा माझी
भक्ति मी शक्तिही मी
माझ्या साठी माझी प्रेरणा
केवळ मी केवळ मी
सुंदर कविता.