आज फिरोजखान यांची पुण्यतिथी व आजच विनोद खन्ना यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांची जागा कधीच भरून निघू शकणार नाही. १९६८ साली चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या विनोद खन्ना यांनी १४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायक आणि सहकलाकार म्हणून जास्तीत जास्त भूमिका साकारल्या होत्या. सुरुवातीच्या काही चित्रपटांमधून ते स्वतःची ओळख निर्माण करू शकले नाहीत. फिरोज खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कुर्बानी’ या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात फिरोज खान यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या तिहेरी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात फिरोज खान यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या तिहेरी भूमिका साकारल्या होत्या. ‘कुर्बानी’ चित्रपटानंतर विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यातील मैत्री अधिक घट्ट झाली. विनोद खन्ना आणि फिरोज खान यांनी कुर्बानी, शंकर शंभू, दयावान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे कुर्बानी, दयावान सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड़ गाजले होते. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ते दोघे खऱ्या आय़ुष्यातही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि विशेष म्हणजे विनोद खन्ना यांचे निधन २७ एप्रिल २०१७ ला झाले तर फिरोज खान यांचे निधन बरोबर आठ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २७ एप्रिल २००९ ला झाले होते. कुर्बानी या चित्रपटातील ईश्वर का दुसरा नाम दोस्ती है हा संवाद आज त्यांच्यासाठी तंतोतत खरा ठरला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply