नवीन लेखन...

सुधीर फडके उर्फ बाबुजी

सुधीर फडके उर्फ बाबुजी यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी झाला.

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या ग. दि. मां.च्या ‘गीतरामायण’चे गायक व संगीतकार म्हणून या क्षेत्रात ते ‘संगीत शिरोमणी’ म्हणून प्रसिद्धीस आले. तो त्यांना लाभलेला परमेश्वरी प्रसाद होता. त्या प्रसादामागे ग. दि. मां.च्या प्रतिभेचा वरदहस्त होता. या कार्यक्रमात अन्य गीतांचा सामावेश त्यांनी कधीच केला नाही. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे हे गीतरामायण १९५५ साली रेडियोवर सुरू झाले. बाबूजींचा सुरेल आवाज, स्पष्ट उच्चार व नेमके स्वराघात यामुळे ते संगीतातील बावनकशी सोन्याचे खणखणीत नाणेच होते. दरम्यान, त्यांनी सुमारे ५६ गाणी असलेल्या गीतरामायणाचे १,८०० प्रयोग देश व विदेशात केले. त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले ‘गदिमां’चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते. गीत रामायणाने रसिक श्रोत्यांवर, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही वेड लावले. का नाही लावणार? एकतर ही रामायणातील गीते आपल्या बोली भाषेतली, नवरसांनी ओतप्रेत भरलेली, मधुर चालींची, कमालीची भावोत्कट. भारतीय जीवन मूल्यांची महती सांगणारी, मनुष्य जीवनातले आदर्श कसे असावेत याचा धडा देणारी, चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी प्रेरणा देणारी गीते. शिवाय बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या स्वर्गीय संगीत, सुरेल चाली आणि दैवी आवाजामुळे ही रामायणातली गाणी साक्षात रामकथेतील प्रसंग, पात्रे आणि घटनाक्रम यांचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करतात.

कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केलं आहे. त्यांनी गोवा मुक्ती संग्रमातही भाग घेतला होता. आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी ‘वीर सावरकर’ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक – प्रभाकर मोने यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव – स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट – एक शिवधनुष्य सुधीर फडके हे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’त जवळजवळ ६० वर्षे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये ‘इंडिया हेरिटेज फाउंडेशन’च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.

सुमारे ५० वर्षे संगीतसृष्टी गाजवणारे बाबूजी माणूस म्हणून श्रेष्ठच होते ते त्यांच्या अभिजात संगीतप्रेमामुळेच! सुधीर फडके यांचे २९ जुलै २००२ रोजी निधन झाले. सुधीर फडके यांना आदरांजली.

सुधीर फडके यांचे संगीत दिलेले चित्रपट.

गोकूळ, रुक्मिणी स्वयंवर, आगे बढो, सीता स्वयंवर, जीवाचा सखा, वंदेमातरम्, अपराधी, जय भीम, माया बाजार, रामप्रतिज्ञा, संत जनाबाई, श्रीकृष्ण दर्शन, जौहर मायबाप, पुढचे पाऊल (1950), मालती, माधवमुरलीवाला, जशास तसे, लाखाची गोष्ट, नरवीर तानाजी, सौभाग्य वाहिनीच्या बांगड्या, पहली तारीख, इन-मीन-साडे-तीन, ऊन पाऊस, गंगेत घोडा न्हाला, शेवग्याच्या शेंगा, सजनी, आंधळा मागतो एक डोळा, माझे घर माझी माणसं, गणगौरी, जगाच्या पाठीवर, भाभी की चूडियाँ, गुरू किल्ली, आम्ही जातो आमच्या गावा, दरार, आराम हराम आहे, आपलेच दात आपलेच ओठ, माहेरची माणसं, धाकटी सून, शूर शिवाजी.

https://www.youtube.com/watch?v=ji4TYrPqJ9o

https://www.youtube.com/watch?v=TGf1-WZEJJg

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..